जग सध्या कोविड महामारीचा सामना करत आहे. त्याविरूद्ध लस हा प्रभावी उपाय शोधण्यात आला आहे. सध्या देण्यात येणाऱ्या लसींसोबतच नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीवर देखील संशोधन चालू होतेच. सध्या या बाबतीतील महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
जगात सध्या उपलब्ध असलेल्या लसी या दंडातुन दिल्या जाणाऱ्या आहेत. त्या अतिशय प्रभावी देखील ठरल्या आहेत. मात्र आता होत असलेल्या संशोधनातून नाकाद्वारे दिली जाणारी लस अधिक प्रभावी ठरू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य म्हणजे भारतातील भारत बायोटेक ही स्वदेशी कंपनी यामध्ये अग्रेसर आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील राजकीय हत्यांचा तपास सीबीआय करणार
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
दंडातून सुईद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीदेखील अनेक चाचण्यांनंतर लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु आता कोविडच्या विविध उत्परिवर्तनांच्या विरुद्ध अधिकाधीक ताकदवान लसींची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीचा पर्याय समोर येत आहे.
या लसीचे विविध फायदे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणतीही लस, ती घेणाऱ्याच्या शरीरात त्या आजाराविरूद्ध प्रतिकारशक्ती तयार करण्याचे काम करते. नाकाद्वारे दिली जाणारी सिरींज अथवा स्प्रेद्वारे दिली जाते.
नाकाद्वारे दिली जाणारी श्वससंस्थेच्या आतल्या भागावर अधिक परिणामकारक ठरते. संपूर्ण श्वसनसंस्थेमध्ये या लसीमुळे कोविड-१९च्या विषाणुचा अवरोध करण्याची क्षमता निर्माण होऊ लागते. त्यामुळे ही लस अधिक प्रभावी ठरते. त्याबरोबरच कमीत कमी वेळात अधिकाधीक लोकांचे लसीकरण करण्यासाठी हा पर्याय अधिक उपयुक्त ठरेल असे देखिल मानले जात आहे.