27 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषNASA : २१ वर्षांपूर्वी आकाशात झेपावलेला स्पेसक्राफ्ट कोसळले; अनर्थ टळला !

NASA : २१ वर्षांपूर्वी आकाशात झेपावलेला स्पेसक्राफ्ट कोसळले; अनर्थ टळला !

पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती. २१ वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता.

Google News Follow

Related

पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती. RHESSI स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. नासाचा हा उपग्रह २१ वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २00२ मध्ये अवकाशात झेपावला होता. २१ वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता.

उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार की काय अशी भीती शास्त्रज्ञांना होती. फेल झालेले नासाचा उपग्रह २१ वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार होते. हा उपग्रह कोसळल्यानंतर पृथ्वीवर मोठा विशान होईल अशी भिती व्यक्त केली जात होती. कारण हे सॅटेलाईट नेमकं कुठे कोसळणार याचबाबत काहीच अंदाज लावता येत नव्हता. मात्र, आता हा उपग्रह अशा ठिकाणी कोसळला आहे ज्यामुळे मानवी जीविताला कोणताही हानी पोहचलेली नाही.

२१ वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २००२ मध्ये नासाचा हा उपग्रह अवकाशात झेपावला होता. २१ वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थितीत होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती. १९ एप्रिल रोजी हा उपग्रह कोसळणार होता. हा उपग्रह नेमका कधी आणि कुठे कोसळेल याबाबत शास्त्रज्ञांना अंदाज लावता येत नसल्याने संपूर्ण जग चिंतेत होते. अखेर १९ एप्रिल २०२३ रोजी उत्तर आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात हे उपग्रह कोसळला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी

साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

आव्हाडांचा हिंदूद्वेष पुन्हा उफाळला; भाजपाकडून संताप

नासाच्या वैज्ञानिकांनी हे उपग्रह सहारा वाळवंटात कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २७३ किलो वजनाचा हा उपग्रह २६ अंश रेखांश आणि २१.३ अंश अक्षांशावर हे उपग्रह सहारा वाळवंटात कोसळला आहे. सहारा वाळवंटात कोसळल्याने मोठी हानी टळली आह. निर्मनुष्य ठिकाणी हे सॅटेलाईट कोसळले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. जर या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भीती व्यक्त केली जात होती.

हा उपग्रह समुद्रात कोसळेल असा अंदाज देखील शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र, अखेरीस हा उपग्रह वाळवंटात कोसळले आहे. Reuven Ramaty High Energy Solar Spectroscopic Imager [ RHESSI ] असे या स्पेसक्राफ्ट उपग्रहाचे नाव आहे.

सौर लहरी आणि कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. मोहिमेच्या कालावधीत, आरएचईएसएसआयने १ लाखपेक्षा जास्त एक्स-रे घटनांची नोंद केली, ज्यामुळे शास्त्रज्ञांना सौर ज्वालांमधील ऊर्जावान कणांचा अभ्यास करण्यास अनुमती मिळाली. या इमेजरमुळे संशोधकांना कणांची वारंवारता, स्थान आणि हालचाल निश्चित करण्यात मदत झाली, ज्यामुळे कणांना कोठे गती दिली जात आहे हे समजण्यास मदत झाली.

आरएचईएसएसआयने सूर्याच्या आकाराचे मोजमाप सुधारणे आणि स्थलीय गॅमा-किरण चमकणे – विजेच्या वादळांमुळे पृथ्वीच्या वातावरणातून उत्सर्जित होणारे गॅमा किरणांचे स्फोट – पूर्वीच्या कल्पनेपेक्षा अधिक सामान्य असल्याचे दर्शविणे यासारख्या फ्लेअर्सशी संबंधित नसलेले शोध देखील लावले.१६ वर्षांच्या ऑपरेशननंतर नासाने २०१८ मध्ये आरएचईएसएसआयला अंतराळयानाशी संवाद साधण्याच्या अडचणींमुळे कामावरून काढून टाकले. आरएचईएसएसआय ही नासाची स्मॉल एक्सप्लोरर्स मोहीम होती, जी मेरीलँडच्या ग्रीनबेल्टमधील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरद्वारे व्यवस्थापित आणि संचालित केली गेली.मात्र RHESSI स्पेसक्राफ्ट सॅटेलाईटसहारा वाळवंटात कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा