सूर्यावर दोन मोठे स्फोट; पृथ्वीच्या संपर्क यंत्रणेला फटका बसण्याची शक्यता!

अमेरिकेच्या नासाची नोंद

सूर्यावर दोन मोठे स्फोट; पृथ्वीच्या संपर्क यंत्रणेला फटका बसण्याची शक्यता!

सूर्यावर दोन मोठे स्फोट झाल्याची नोंद अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने केली आहे. या स्फोटामुळे शक्तीशाली ऊर्जेचा झोत बाहेर फेकला गेला असून याचा परिणाम रेडिओ संपर्क यंत्रणा, विजेचे पॉवर ग्रीड आणि नेव्हिगेशन सिग्नलवरही होण्याची शक्यता आहे.

शुक्रवार, १० मे रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजून २३ मिनिटांनी आणि ११ मे रोजी स्थनिक वेळेनुसार सकाळी सात वाजून ४४ मिनिटांनी सूर्यावर दोन मोठे स्फोट झाले, असे ‘नासा’ने स्पष्ट केले. ‘नासा’ने या घटनेची काही छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या सौर उर्जेच्या झोताची अनुक्रमे x५.८ आणि x१.५ क्लास अशी वर्गवारी केली आहे. या सौरऊर्जेच्या झोतामुळे रेडिओ संपर्कयंत्रणा, पॉवर ग्रिड आणि नेव्हिगेशन सिग्नलवर परिणाम होऊ शकतो. तसेच, अंतराळयाने आणि अंतराळवीरांनाही धोका बसू शकतो, असे नासाने निवेदनात नमूद केले आहे. यातील x म्हणजे सर्वांत तीव्र झोत, असे मानले जाते. तर, आकड्यांवरून त्याच्या ताकदीचे स्वरूप कळते.

हे ही वाचा:

“नरेंद्र मोदीचं २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहणार”

छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम

ट्रकच्या धडकेत गाडी उलटी आणि बाहेर पडले सात कोटी!

लडाखमध्येही काही ठिकाणी या सौरवादळामुळे आकाश लकाकले होते. सौरवादळामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये प्रकाशांच्या खेळांचे सुंदर दृश्य दिसले होते. तज्ज्ञांच्या मते, या प्रकाशांच्या खेळाला ऑरोरा असे म्हटले जाते. यात आकाशात लार रंगाचे स्तर दिसतात. काही वेळा आकाशात ऑरोरामध्ये विविध रंगांचे ऑरोरा दिसतात. मात्र ऑरोराल आर्क्समध्ये ठरलेला रंग असतो.

Exit mobile version