दिल्लीतील न्यायालयाने नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले आहे.हे प्रकरण दिल्लीचे विद्यमान लेफ्टनंट गव्हर्नर एलजी व्ही.के. सक्सेना यांच्याशी संबंधित आहे.वास्तविक केव्हीआयसीचे तत्कालीन अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.या प्रकरणी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना मानहाणीप्रकरणी दोषी ठरवले आहे.यासाठी मेधा पाटकर यांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
मेधा पाटकर आणि दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल सक्सेना यांचे हे प्रकरण २००० सालचे आहे.नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्या परकरणी मेधा पाटकर यांनी व्ही के सक्सेना यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.तर दुसरीकडे व्हीके सक्सेना यांनी आपल्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचे दोन खटले दाखल केले होते.त्यावेळी व्ही के सक्सेना हे अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कॉन्सिल फॉर सिव्हील लिबर्टीजचे प्रमुख होते.
हे ही वाचा:
तुम्ही ४०० प्लस जागा द्या, आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू!
हम तो डुबेंगे सनम… काँग्रेसने स्पष्ट केला इरादा
विशाल अग्रवालसह इतर आरोपींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी!
मुस्लिम लांगुलचालन करणाऱ्या ममता बॅनर्जींना दिलेला झटका अगदी योग्य!
या प्रकरणात मेधा पाटकर यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.सक्सेना यांच्याविरोधात मेधा पाटकर यांनी केलेली वक्तव्ये केवळ बदनामीकारकच नाहीत, तर ती नकारात्मक गोष्टींना चालना देतात असं निरीक्षण दिल्ली न्यायायलाने नोंदवलं आहे. मेधा पाटकर यांनी केवळ व्हीके सक्सेना यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चुकीची माहिती देऊन आरोप केले होते, असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.अखेर मेधा पाटकर यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून कायद्यानुसार त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.