26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमहाराष्ट्रातल्या तीन महिलांना राष्ट्रपतींकडून ‘नारी शक्ती पुरस्कार’

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना राष्ट्रपतींकडून ‘नारी शक्ती पुरस्कार’

Google News Follow

Related

समाजासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील तीन महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान केला आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने २०२० आणि २०२१ साठी नारी शक्ती पुरस्कार जाहीर केला होता. देशभरातील एकूण २८ महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. यामध्ये २०२० च्या पहिल्या सर्पमित्र महिला विनिता बोराडे आणि २०२१ साठी उद्योजक कमल कुंभार तसेच कथ्थक नृत्यांगना सायली आगवणे यांचा समावेश आहे. २०२० मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सायली ह्या जन्मापासून डाउन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षांपासून कथ्थक नृत्य करतात. त्या सध्या डाउन सिंड्रोम ग्रस्त असलेल्या ५० जणांना कथ्थक शिकवतात. तर वनिता बोराडे ह्या पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत ५० हजारांहून अधिक सापांचे प्राण वाचवले आहेत. तसेच कमल कुंभार या सामाजिक उद्योजिका असून त्यांना पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योगाला चालना दिली आहे.

व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणून या पुरस्काराने महिलांना सन्मानित करण्यात येते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, या महिला समाजाला दिशादर्शक असे काम करतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणुन त्यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.

हे ही वाचा:

जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम

शिवसेना नेते संजय कदम यांच्यावर आयकर विभागाची धाड!

कोण आहे हा बजरंग खरमाटे? आमदार भातखळकरांनी विचारला सवाल

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालवर आयकर विभागाचे छापे

२०२० च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएमआणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच २०२१ च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा