राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता महामंडळाच्या जी. टी. हॉस्पिटल कंपाऊंड, बी. टी. मार्ग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मागे, सीएसएमटी स्टेशनजवळ असलेल्या कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
हे ही वाचा:
भारतातून गव्हाची दुप्पट निर्यात
काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे-थरूर यांचे भवितव्य मतपेटीत बंद
रोहितने शमीला एकच षटक दिले आणि भारताने सामनाच जिंकला
यासंदर्भात १७ ऑक्टोबरला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे. नरेंद्र पाटील यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्न केले.