पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, बुधवारपासून राज्यासह पुणे, मुंबईमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार होता. तर, संध्याकाळी त्यांची एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार होती. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नरेंद्र मोदींचा हा महत्वपूर्ण दौरा मानला जात आहे. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे आता नरेंद्र मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही पार पडणार होते. तसेच पुण्यातील तसेच एसपी कॉलेजमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या या सभेवर पावसाचे सावट घोंगावत होते. बुधवारपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. अखेर नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
PM Narendra Modi's visit to Pune, Maharashtra cancelled due to the heavy rain situation in the city.
(File photo) pic.twitter.com/VJlrBepmzM
— ANI (@ANI) September 26, 2024
हे ही वाचा:
४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली
न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य
अंधेरीत महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू
उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!
परतीच्या पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी पुणे, नाशिक, मुंबईसह मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा प्रचंड जोर होता. हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत सखल भागात पाणी साचून रस्ते वाहतूक मंदावली होती तर रेल्वे वाहतूकही उशिराने सुरू होती. बुधवारी सायंकाळी शहरातील अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.