पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यांनी लोकसभा निवडणूकीचा प्रचार समाप्त होताच कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांच्या स्म्राकास्थळावर ध्यानधारणा केली. ध्यानधारणेच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सूर्याला जलार्पण केले आहे. यासोबतच स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला आणि हातामध्ये जपमाळ घेऊन मंदिराची परिक्रमा देखील केली आहे.
‘सूर्य अर्घ्य’ ही आध्यात्मिक साधनेशी संबंधित परंपरा आहे, ज्यामध्ये भगवान सूर्याला जल अर्पण करून पूजा केली जाते. तसेच पंतप्रधान मोदींनी भगवे वस्त्र परिधान केले होते आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. हातात जपमाळ घेऊन मंडपाभोवती प्रदक्षिणा देखील घातल्या.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० मे च्या सायंकाळी कन्याकुमारी गाठली. सर्वप्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या मंदिरात प्रार्थना केली. यानंतर तेथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकास्थळी जाऊन आपल्या ध्यान साधनेला सुरुवात केली होती. तीन दिवसांची ही ध्यान साधना आज दुपारी समाप्त झाली. सुमारे ४५ तासांची हि ध्यानधारणा होती.
हेही वाचा..
महाराष्ट्रात महायुतीला ४० जागा मिळाल्या तर म्हणे लोक रस्त्यावर उतरतील…
गंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, अंदाजापेक्षा मोदींचे आकडे मोठे असतील!
‘इस्रायलकडून हमासला नवीन शांतता कराराचा प्रस्ताव’
रविवारी केजरीवाल जाणार पुन्हा तुरुंगात
भाजपाने पंतप्रधान मोदींच्या कन्याकुमारीतील ध्यानधारणेचा व्हिडीओ अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यासोबतच पक्षाने त्यांचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ते भगव्या वस्त्रात ध्यान मंडपात ध्यानस्थ झाल्याचे दिसून येतात. ध्यान साधना संपताच पंतप्रधान मोदी हे दुपारी दिल्लीला रवाना झाले. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी याआधीच्या निवडणुकीनंतर सुद्धा अशी ध्यान साधना केली होती. केदारनाथच्या गरुड चट्टी येथे त्यांनी ध्यान केले होते. यावेळेस त्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली कन्याकुमारीची ध्यान साधनेसाठी निवड केली होती.
विवेकानंद शीलास्मारकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४५ तासांच्या मुक्कामासाठी कडक सुरक्षेसह सर्व व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कन्याकुमारी जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक होती. सुमारे दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. याशिवाय तटरक्षक दल आणि नौदलाचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. आपली ध्यानधारणा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र सुद्धा लिहिले आहे. ते पत्रही समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे.