पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पश्चिम बंगाल आणि बिहारचा दौरा करतील. यावेळी ते कोलकात्यामध्ये देशातील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या पाण्याखालील भुयाराचे उद्घाटन करतील. ही मेट्रो हावडा मैदान आणि एस्प्लेनेड यांच्या दरम्यान धावेल. त्याचवेळी पंतप्रधान मोदी कोलकात्यातील कोट्यवधी रुपयांच्या दळवळणाशी संबंधित प्रकल्पांचे उद्गाटन आणि भूमिपूजन करतील. या उद्घाटनामुळे दीर्घकाळापासून पाहिलेले स्वप्न साकार होणार आहे.
पंतप्रधान मोदी हे कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवि सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि ताराताला-माझेरहाट मेट्रो सेक्शनचे उद्घाटन करतील. तर, पाण्याखालील मेट्रो हुगळी नदीच्या तळाच्या ३२ मीटर खालून धावेल. हुगळी नदीच्या खालून धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो रेल्वे नदी आणि हावडा शहराला कोलकाता शहराशी जोडेल. कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेन्ड मेट्रो भुयारी मार्ग कोणत्याही नदीखाली बनणारा पहिला भुयारी मार्ग आहे. याचबरोबर हावडा मेट्रो स्थानक भारताचे सर्वांत खोल मेट्रो स्थानक आहे. तर, रेल्वे रूळ, फलाटांच्या वर उभारले गेलेले माजेरहाट मेट्रो स्थानक हे एकमेव स्थानक आहे.
हे ही वाचा:
शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!
निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!
गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!
कदाचित माझे शब्द मोदीजींना आवडले नसावेत!
कोलकाता मेट्रोचे काम सन १९७०च्या सुमारास सुरू झाले होते. मात्र मोदी सरकारने गेल्या १० वर्षांच्या काळात गेल्या ४० वर्षांच्या तुलनेत अधिक चांगले काम केले आहे. पंतप्रधानांचे लक्ष २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र तयार करण्याचे आहे. त्यासाठीच देशातील पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. या वर्षांत मेट्रोसेवेचे काम अनेक टप्प्यांत पुढे गेले. सद्यस्थितीत पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोरसाठी नदीखालून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.