‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ठिकठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या महान राजाला वंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी खंबीरपणे ते उभे राहात असत. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. ‘हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आमचे आराध्यदैवत, पराक्रमाचे मूर्तिमंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!’ असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या आहेत. तसेच भेदभाव नाही, सर्वांना समान न्याय, महिला, उपेक्षितांचे कल्याण, कल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श, रयतेचे राजे, आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..

रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

गायिका वैशाली भैसनेला जीवे मारण्याची धमकी

‘गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी व्हायला हवी’

दरवर्षीपणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा होत असून यंदा दोन वर्षांनी कोरोना निर्बंध शिथिल झाल्यावर हा सोहळा पार पडत असल्यामुळे सर्वांमध्ये उत्साह आहे.. शिवनेरीवर गेल्या काही वर्षांपासून शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळणा जोजवला जातो. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेते शिवजन्म सोहळ्यासाठी शिवनेरीवर उपस्थित आहेत.

Exit mobile version