भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन व्हर्च्युअल पद्धतीने झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या संकल्पनेविषयी सांगितले.
या परिषदेला महिलांच्या सशक्तीकरणाशी जोडण्यात आले आहे. ही महत्त्वाची भूमिका आहे. खरे तर विज्ञान आणि महिला सशक्तीकरण हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी जोडले गेले आहेत. विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण होते तसेच महिलांमुळे विज्ञानही सशक्त होते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधान यावेळी म्हणाले की, पुढील २५ वर्षांत भारत ज्या उंचीवर असेल त्यात वैज्ञानिक शक्तीची भूमिका खूप महत्त्वाची असेल. विज्ञानात आवडीसोबत देशाच्या सेवेचा संकल्प जोडला जातो, तेव्हा त्याचे निकालही अभूतपूर्व असतात. मला विश्वास आहे की, भारतातील वैज्ञानिक क्षेत्र देशाला एक असे शिखर गाठून देईल ज्यावर भारताचा अधिकार होता.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, निरीक्षण हे विज्ञानाचे मूळ आहे. या मार्गाने अनेक पॅटर्न उपयोगात आणतो. या दरम्यान एका वैज्ञानिकाला डेटा गोळा करणे व त्याचे विश्लेषण करणे महत्त्वपूर्ण असते. २१व्या शतकातील भारतात २ गोष्टी आहेत. डेटा आणि तंत्रज्ञान. या दोघात भारतातील विज्ञानाला एका उंच शिखरावर नेण्याची ताकद आहे. डेटा ऍनालिस्टचे क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. आजचा भारत ज्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून पुढे जात आहे, त्याचे परिणाम आपण पाहात आहोत. त्यात भारत जगातील अव्वल देशात सहभागी होत आहे. २०१५ ला आपण १३० देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये ८१व्या क्रमांकावर होतो. पण २०२२मध्ये आपण ४०व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आज पीएचडीच्या बाबतीत जगात अव्वल तीन देशांत गणला जातो.
पंतप्रधानांनी सांगितले की, स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये अव्वल तीन देशात आपण आहोत. इंडियन सायन्स काँग्रेसची थीमही अशी आहे, ज्याची सर्वाधिक चर्चा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या आधारेच जगाचे भविष्य सुरक्षित आहे. या विषयाला महिला सशक्तीकरणासोबत जोडले आहे. व्यावहारिक रूपातही हे एकमेकांशी जोडले गेले आहे. आम्ही विज्ञानाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करूच पण महिलांच्या सहभागामुळे विज्ञानाचे सशक्तीकरणही होईल.
हे ही वाचा:
‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’
छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग
‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे
मोदींनी सांगितले, विज्ञान आणि संशोधनाला नवी गती मिळावी हे आमचे उद्दीष्ट आहे. जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. यातही महिला विकास हा महत्त्वाचा विषय आहे. ८ वर्षांत भारताने गव्हर्नन्सपासून समाज व अर्थकारणत अनेक कामे केली ज्यांची आज चर्चा होत आहे. भारतात आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना गती मिळाली. भागीदारी किंवा स्टार्टअपमध्येही महिला आपल्या क्षमता दाखवत आहेत. महिलांचे हे योगदान दाखवून देते की, समाज पण पुढे चालला आहे. सोबत विज्ञानही पुढे चालले आहे.