22 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषकाँग्रेसचे 'गरिबी हटाओ' वचन हीच इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक

काँग्रेसचे ‘गरिबी हटाओ’ वचन हीच इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील प्रचार सभेत दिले उत्तर

Google News Follow

Related

कर्नाटकात शेवटच्या टप्प्यात असलेल्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या हमी संदर्भात कर्नाटकातील जनतेला सावध करतांना पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षाने ५० वर्षांपूर्वी दिलेले ‘गरिबी हटाओ’ वचन ही इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक होती. जी अजूनही सुरू आहे अशी जोरदार टीका केली. निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या शिव्या आणि खोटेपणामुळे कर्नाटकातील जनतेमध्ये संताप असून येत्या १० मी रोजी ही जनता मतदानातून उत्तर देईल अशा शब्दात पंतप्रधांनी निशाणा साधला.

एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी ‘गरीबी हटाओ’ची सर्वात मोठी हमी दिली होती, संपूर्ण निवडणूक काँग्रेसने याच एका हमीवर लढवली. ही इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक असून ती अजूनही सुरू आहे. पण ओबीसी, लिंगायत आणि इतर समाजातील लोक काँग्रेस नेत्यांच्या या गैरवर्तनामुळे संतापले आहेत आणि त्यांच्या रागाचे रूपांतर आता पूर्ण बहुमताने भाजपला सत्तेवर आणण्याच्या वचनबद्धतेत झाले आहे असा विश्वास पंतप्रधांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसच्या राजवटीत पैशांची लूट सुरु होती त्यामुळे विकास होऊ शकला नाही. काँग्रेसला खोटी आश्वासने देण्याची प्रदीर्घ काळापासून सवय आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत जनता सवाल करते त्यावेळी याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे असे उत्तर दिले जाते अशा शब्दात पंतप्रधांनी काँग्रेसची लक्तरे काढली.

हे ही वाचा:

आयपीएलमध्ये विराट ठरला सात हजारी मनसबदार

विसरभोळेपणामध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर, कमोड, झाडूही विसरतात टॅक्सीत

तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

एकलव्य खाडे, आर्यन सकपाळ यांनी ठोकली शतके

डबल इंजिन सरकार आल्यानंतर झालेल्या बदलांचे दाखले पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिले. डबल इंजिन सरकारने हवेरीमध्ये नवीन मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेज आणले, डबल इंजिन सरकारमुळे हावेरी युनिव्हर्सिटीला कोट्यवधी रुपये मिळाले, डबल इंजिन सरकारमध्ये हावेरीही नवीन मिल्क प्लांट मिळाला, दुहेरी इंजिन मिळाले, कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांवरही सरकार अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचा पाढा वाचून काँग्रेसची बोलती बंद केली

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा