पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पहिला लता दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रज्ञान करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. लता दीदी म्हणजे एक भारत, श्रेष्ठ भारतची मधुर प्रस्तुती होत्या असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान मोदींनी केले. मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला.
मी अभिमानाने सांगतो लता दीदी माझ्या ज्येष्ठ भगिनी होत्या. ४ दशकांपूर्वी सुधीर फडकेंनी आमची ओळख करून दिली आणि तेव्हापासून मंगेशकर परिवारासोबत परिवारासोबतर आपला ऋणानुबंध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. तर अनेक वर्षानंतर पहिल्यांदा असे घडेल की रक्षाबंधनाला लता दीदी नसतील असे म्हणत नरेंद्र मोदी भावुक झाले. मी शक्यतो अशा पुरस्कार सोहळ्यांना जाणे टाळतो. पण जेव्हा पुरस्कार लता दीदींच्या नावाने आहे तेव्हा मी त्याला टाळू शकलो नाही.
त्या कायम म्हणायच्या व्यक्ती आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा होतो. देशासाठी जेवढे जास्त काम कराल तेवढे तुम्ही मोठे व्हाल असे त्या मानायच्या. पण लता दीदी या वयाने पण मोठ्या होत्या आणि कामानेही मोठ्या होत्या. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी असे काम केले की लोक त्यांना देवी सरस्वतीचे रूप मानायचे. ग्रामोफोन, कॅसेट, सीडी, म्युझिक सिस्टिम, ऑनलाईन म्युझिक, आणि आता ऍप पर्यंत लता दीदींच्या गाण्यांचा प्रवास आहे.
हे ही वाचा:
गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या
‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
त्या स्वतःला संगीताची साधक मानत. त्या रेकॉर्डिंगला जाताना चप्पल बाहेर काढून ठेवत. त्यांच्यासाठी संगीतसाधना आणि ईश्वर साधना एकाच होती. ईश्वराचे उच्चारण पण स्वराशिवाय अपूर्णच असते. जिथे स्वर आहे तिथेच पूर्णत्व आहे आणि जर त्या स्वराचा उगम लता दीदींसारखा पवित्र असेल तर त्याचे भावही संगीतात मिसळतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लता दीदींची सशरीर यात्रा अशावेळी संपुष्टात अली जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. त्यांनी स्वातंत्र्याच्या आधीपासून देशाला आवाज दिलाय. त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची चेतना होती. ती त्यांच्या वडिलांनीच पेटवली होती. त्यांच्या वडिलांनी, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी ब्रिटिश व्हॉइसरॉयच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले एक गीत गायले होते. जे वीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या विरोधात लिहिले होते. हे फक्त मास्टर दीनानाथच करू शकतात
लता दीदींनी ‘शिवकल्याण राजा’ च्या माध्यमातून सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले गाणे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली पदे अजरामर केल्येत. ‘ए मेरे वतन के लोगो’ च्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण केली. त्या एक भारत, श्रेष्ठ भारतची मधुर प्रस्तुती होत्या. त्यांनी भारताच्या ३० पेक्षा अधिक विविध भाषांमध्ये गाणी गायली. तर जगात त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या.
पुण्यात त्यांनी बांधलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बनवले जे आजही गरिबांची सेवा करत आहे. कोरोना काळात गरिबांसाठी सर्वाधिक काम करणाऱ्या काही रुग्णालयांपैकी मंगेशकर रुग्णालय एक होते असे म्हणत पंतप्रधान मोदींनी लता दीदींच्या सामाजिक कार्याचीही प्रशंसा केली.