प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेला पोशाख आता चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली होती. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला स्टोल घातला होता. पंतप्रधान मोदी यांनी ब्रह्मकमळाच्या आकाराचा मास्क घातला होता. ब्रम्हकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल असून केदारनाथमध्ये पूजा करताना हे फुल वापरले जाते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आज असा वेगळा पोशाख परिधान केला होता. गतवर्षी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरची खास पगडी परिधान केली होती. जामनगरच्या राजघराण्याकडून त्यांना ही पगडी भेट म्हणून दिली होती. मोदी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान करत असतात.
हे ही वाचा:
राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे
भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे
प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा
राजपथावर घडले भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचे दर्शन
२०२० मध्ये त्यांनी बांधणीचा फेटा बांधला होता. केशरी रंगाच्या या फेट्यात पिवळा रंगही होता. २०१५ पासून आतापर्यंतच्या प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला मोदींनी खास प्रकारच्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचे दिसले होते.