पंतप्रधान मोदींनी केले भारताच्या डेफलिम्पिक चमूचे अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी केले भारताच्या डेफलिम्पिक चमूचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या डेफलिम्पिक चमूशी संवाद साधला आहे. नुकत्याच पार पडलेल्या डफली पीक स्पर्धेत भारतीय संघाने इतिहास रचला आहे भारतीय समूहाने आजवरचा आपले सर्वोत्तम सादरीकरण या स्पर्धेत केले. यामध्ये भारतीय क्रीडापटूंनी सात कांस्य पदके, एक रौप्यपदक आणि तब्बल आठ सुवर्णपदके मिळवली आहेत. शनिवार, २१ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चमूशी भेट देऊन संवाद साधला.

या भेटीची छायाचित्र आपल्या ट्विटरवर शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डेफलिम्पिकमध्ये आपल्या देशाला अभिमान आणि सन्मान मिळवून देणाऱ्या या आपल्या चॅम्पियन्स सोबतचा संवाद मी कधीही विसरणार नाही. या सर्व खेळाडूंनी त्यांचे अनुभव सांगितले. मला त्यांच्यात निष्ठा आणि दृढनिश्चय दिसत होता. मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो.

हे ही वाचा:

मी जिवंत आहे…हयात असल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा आटापीटा

जिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

डेफलिम्पिक हे कर्णबधिर खेळाडूंसाठी आयोजित केले जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतर्फे हे आयोजन करण्यात येते. दर चार वर्षांनी ही स्पर्धा पार पडते. १९२४ साली पॅरिस येथे पहिले डेफलिम्पिक खेळले गेले. या आधी १९९३ च्या डेफलिम्पिकमध्ये भारताने आपले सर्वोत्तम सादरीकरण केले होते.

Exit mobile version