पहिलं तिकीट खरेदी करून पंतप्रधान मोदींनी केले प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

पहिलं तिकीट खरेदी करून पंतप्रधान मोदींनी केले प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, १४ एप्रिल रोजी नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे प्रधानमंत्री संग्रहालय देशातील सर्व पंतप्रधानांचे जीवन आणि योगदान यावर आधारित आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी या संग्रहालयाचे पहिले तिकीट खरेदी केले. या संग्रहालयात देशातील सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.

या संग्रहालयाची माहिती प्रसार भारती, दूरदर्शन, चित्रपट विभाग, संसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, भारतीय आणि विदेशी माध्यम संस्था, परदेशी वृत्तसंस्था इत्यादी संस्थांच्या संसाधने/संकलकांच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. या संग्रहालयात स्वातंत्र्यलढ्यापासून ते संविधान निर्मितीपर्यंतची कथाही मांडण्यात आली आहे. विविध आव्हानांना न जुमानता आपल्या पंतप्रधानांनी देशाला कसा नवा मार्ग दाखवला आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशी सुनिश्चित केली हे देखील हे संग्रहालयात दाखवण्यात आले आहे.

तरुण पिढीला सर्व भारतीय पंतप्रधानांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्याबद्दल माहिती व्हावी. त्यामधून प्रेरणा मिळावी, यासाठी हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ट्रॉली बॅगेत लपवले होते २४ कोटींचे ड्रग्ज

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती

गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

भारतीयांसाठी ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ तिकिटाची किंमत ऑनलाइन खरेदी केल्यास १०० रुपये आणि ऑफलाइन खरेदी केल्यास ११० रुपये आहे. तर विदेशी नागरिकांसाठी ७५० रुपये असणार आहे. ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकिटे खरेदी केल्यास त्यांना ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांनी केलेल्या बुकिंगवर २५ टक्के सूट मिळणार आहे.

Exit mobile version