पंतप्रधान नरेंद्र मोदी ४५ तास ध्यानधारणेत

प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारीत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ४५ तास ध्यानधारणेत

लोकसभेच्या निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना झाले. तिथे ते ४५ तास ध्यानधारणा करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांनी ज्याठिकाणी ध्यानधारणा केली होती, तिथेच मोदी ध्यान करणार आहेत.

गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता त्यांच्या ध्यानधारणेला सुरुवात झाली. या दरम्यान ते केवळ द्रवपदार्थांचे सेवन करणार आहेत. त्यात नारळाचे पाणी, फळांचा रस इत्यादींचा समावेश असेल.

या दरम्यान पंतप्रधान मौन धारण करतील आणि या ४५ तासात ध्यानधारणेतून बाहेर येणार नाहीत. कन्याकुमारीत आल्यानंतर मोदींनी भगवती अम्मन मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. संपूर्ण पांढऱ्या पोशाखात मोदी होते. त्यांनी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले, आरती केली आणि प्रसाद ग्रहण केला.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू!

सपा नेते आझम खानला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, १४ लाखांचा दंडही ठोठावला!

“केजरीवालांची प्रकृती खराब आहे तर ते निवडणुकीचा प्रचार का करतायत?”

मेक्सिको, तुर्कीमध्ये इस्रायली दूतावासांवर हल्ले

२०१४ मध्ये मोदी यांनी प्रतापगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत साधना केली होती आणि २०१९ मध्ये ते केदारनाथला गेले होते. स्वामी विवेकानंद यांनी कन्याकुमारीच्या खडकावर तीन दिवस ध्यानसाधना केली होती. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती.

Exit mobile version