27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषलाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळ भाषण करण्याचे रेकोर्ड नरेंद्र मोदींच्याचं नावे

लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळ भाषण करण्याचे रेकोर्ड नरेंद्र मोदींच्याचं नावे

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे पंतप्रधानांचे भाषण हे ८३ मिनिटांचे

Google News Follow

Related

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत देशाच्या विकासाचा प्रवास जनतेसमोर उलगडला. पंतप्रधान झाल्यापासून लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी दहाव्यांदा देशाला संबोधित केले आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे पंतप्रधानांचे भाषण हे ८३ मिनिटांचे होते.

मेरे प्यारे परिवारजन… अशी वेगळी भाषणाची सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी महागाई, देशातील युवा पिढी, मणिपूर मुद्दा, अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

तर यापूर्वी २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ मिनिटांचे भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला होता. पण आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी फक्त एकदाच एका तासापेक्षा कमी वेळेचे भाषण केले आहे.

नरेंद्र मोदींनी कोणत्या वर्षी किती मिनिटांचे केले भाषण

  • २०१४ – ६५ मिनिटे
  • २०१५ – ८६ मिनिटे
  • २०१६ – ९६ मिनिटे
  • २०१७ – ५६ मिनिटे
  • २०१८ – ८२ मिनिटे
  • २०१९ – ९३ मिनिटे
  • २०२० – ८६ मिनिटे
  • २०२१ – ८८ मिनिटे
  • २०२२ – ८३ मिनिटे
  • २०२३ – ८९ मिनिटे

हे ही वाचा:

वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम

मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला

देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज

मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांनी बदलला डीपी, पण गमावले गोल्डन टिक

संसदेतही सर्वांत जास्त वेळ भाषण करण्याचा विक्रम मोदींच्या नावे

लोकसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांत जास्त वेळ म्हणजे २ तास १३ मिनिटे आणि ५३ सेकंदाचे भाषण केले. यावेळी त्यांनी आत्तापर्यंतच्या सर्व भाषणांचे रेकॉर्ड तोडले आहेत. १९६५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत २ तास १२ मिनीटे भाषण केले होते. यावेळी अविश्वास ठरावावर नरेंद्र मोदी यांनी २ तास १३ मिनिटे ५३ सेकंद भाषण करून सर्व विक्रम मोडीत काढले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा