पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून हवाई पाहणी केली.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या उत्पादन केंद्रात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदी आले होते. पंतप्रधान मोदी संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर जोर देत असून सरकारने भारतातील उत्पादन आणि त्यांची निर्यात कशी वाढवली आहे यावर ते लक्ष देत आहे. तेजस हे हलके लढाऊ विमान खरेदी करण्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे. यूएस डिफेन्स कंपनी GE एरोस्पेसने पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान एमके-II-तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी HAL सोबत करार केला होता.
भारतीय हवाई दलाने आणखी लढाऊ विमाने आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) तेस खरेदी करण्याची आणि सुखोई-30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारित करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या लवकरच अब्जावधी डॉलर्सचे संभाव्य करार होण्याची शक्यता आहेत. यातच शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी HAL च्या बंगळुरु येथील प्लांटला भेट दिली आहे. स्वदेशी HAL फ्रेंच कंपनी सफ्रान (Safran) कंपनी सोबत संयुक्तपणे हेलिकॉप्टर इंजिन डिझाइन आणि विकसित करण्यावर काम सुरू करणार आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत यांचा इस्रायलकडून निषेध
बाळासाहेब ठाकरेंना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी विश्वप्रवक्ते कुठे होते?
ताडोबातल्या वाघाने जोडीदाराच्या शोधात केला २ हजार किलोमीटरचा प्रवास
ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार प्रकरणी रोमीन छेडाला अटक
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रवासाची चित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. याचा अनुभव शेअर करताना पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज तेजसमध्ये उड्डाण करताना मी अभिमानाने सांगू शकतो की, आमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आम्ही स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. यावेळी पीएम मोदींनी को-पायलटची भूमिका बजावली. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान, पीएम मोदींनी तेजस उत्पादन सुविधा आणि इतर सुविधांचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित लोकांशी चर्चा केली.
मैं आज तेजस में उड़ान भरते हुए अत्यंत गर्व के साथ कह सकता हूं कि हमारी मेहनत और लगन के कारण हम आत्मनिर्भरता के क्षेत्र में विश्व में किसी से कम नहीं हैं। भारतीय वायुसेना, DRDO और HAL के साथ ही समस्त भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/xWJc2QVlWV
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023