देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा कारगीलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झाले आहेत. संपूर्ण दिवस पंतप्रधान मोदी हे जवानांसोबत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी जवान काही देशभक्तीपर गाणी गात असताना त्यांच्यासोबत आनंद घेताना दिसले. यावेळीचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दिवाळी निमित्त काही जवान वाद्ये वाजवत ‘मां तुझे सलाम’ हे गाणं गात होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत उभं राहून गाण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी टाळ्या वाजवून जवानांमध्ये जोश भरण्याचं काम केलं. पतंप्रधान मोदी हे बँडच्या मध्यभागी उभे असून त्यांच्या बाजूला काही जवान गिटार आणि इतर वाद्ये वाजवताना दिसत आहेत.
A spirited Diwali in Kargil! pic.twitter.com/qtIGesk98x
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी कारगीलमध्ये दाखल झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी त्यांनी जवानांना मिठाईचं वाटप केलं.
हे ही वाचा:
मुंबई विकास महामंडळ; रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर
गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द
“कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही” असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.