असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा

संतसज्जनांच्या उपस्थितीत राजदंड नव्या संसद भवनात आणण्यात आला.

असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अधिनम मठाच्या संतांनी सेंगोल तथा राजदंड सुपूर्द केला. त्यानंतर नरेंद्र मोदी दोन्ही हातात हा राजदंड धरून संसदेच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत सर्व संतमंडळी चालत होती. संसदेच्या भव्य दालनात मोदी यांनी प्रवेश केला. त्यावेळी मंत्रोच्चार करत सगळे या दालनात आले. सोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिरलाही होते.

 

जिथे सभागृहात आसन व्यवस्था आहे. तिथून मोदी हे चालत पुढे आले. त्यांनी हा राजदंड दोन्ही हातात धरला होता. या राजदंडावर नंदी विराजमान असून तो न्यायाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या राजदंडाला महत्त्व आहे.

हे ही वाचा:

पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’

शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची चॉपरचे वार करून हत्या

पोक्सो कायद्याचा गैरवापर होत आहे! बृजभूषण सिंह यांची मागणी

शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची चॉपरचे वार करून हत्या

नरेंद्र मोदी प्रत्यक्ष सभागृहात आल्यानंतर तिथे काही काळ थांबले. सर्व साधूसंतांनी तिथे एकेठिकाणी उभे राहून नरेंद्र मोदींना आशीर्वाद दिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे राजदंड घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ गेले. तिथे या राजदंडाच्या प्रतिष्ठापनेची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे लोकसभा अध्यक्ष बिरला हेदेखील पोहोचले. मग नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी राजदंड उभा केला. नंतर तिथे त्यांनी दीपप्रज्वलन केले.

ओम बिरला यांनीही दीपप्रज्वलन केले. नंतर पंतप्रधानांनी तिथे ठेवलेली फुले राजदंडाला अर्पण केली. लोकसभा अध्यक्षांनीही फुले वाहिली. मग दोघांनीही या राजदंडाला अभिवादन करत उपस्थितांनाही वंदन केले. नंतर तिथेच उभ्या असलेल्या संतसज्जनांना वाकून नमस्कार करत नरेंद्र मोदी पुढे निघाले. या सगळ्या संतसज्जनांनी नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिले.

Exit mobile version