पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!

पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित, पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले विदेशी सरकार प्रमुख ठरले आहेत.पुरस्काराच्या स्थापनेपासून आतापर्यंत चारच मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.भूतानच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना तेथील राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भूतानचा हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले विदेशी सरकार प्रमुख ठरले.यापूर्वी २००८ मध्ये तिची रॉयल क्वीन आजी आशी केसांग चोडेन वांगचुक, परमपूज्य जे थ्रिजूर तेन्झिन डेंडुप आणि २०१८ मध्ये परम पावन जे खेंपो ट्रुल्कु नगावांग जिग्मे चोएद्रा यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

इलेक्टोरल बॉण्ड्स: बीआरएसला एमइआयएलकडून सर्वाधिक देणगी

वडील गृहमंत्री असताना कार्ति चिदंबरमनी घेतले ५० लाख

उत्तर प्रदेशमधील मदरसा शिक्षण कायदाच अवैध

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर पोस्ट करत भूतानचे आभार मानले.पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये लिहिले की, ‘भूतानकडून ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे.मी हा पुरस्कार १४० करोड भारतीयांना समर्पित करत आहे”. पंतप्रधान यांच्या भेटीवर भारत आणि भूतानमध्ये एकूण ७ करार झाले आहेत. हे सर्व करार पेट्रोलियम, ऊर्जा, खेळ, वैद्यकीय उत्पादनांच्या चाचणीशी संबंधित आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचे पारो विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावरच स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पारो विमानतळ ते देशाची राजधानी थिंपूपर्यंतचा संपूर्ण ४५ किमीचा रस्ता सजवण्यात आला होता.भूतानमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी भूतानच्या लोकांना अभिवादन केले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला.पंतप्रधान मोदींचा भूतानचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे.

Exit mobile version