पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान नरेंद्र मोदींनी एका मराठमोळ्या तरुणाचे त्याच्या कार्याबद्दल कौतुक केले. मयूर पाटील असे या तरुणाचे नाव असून त्याने गाड्यांचे मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध लावला आहे. त्यांनी मायुरचे कौतुक केले असून मयूरशी संवाद साधला.
गाड्यांचे मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध मयूरने लावला असून त्याने स्मॉल स्पार्क कन्सेप्ट्स या नावाने त्याचं एक स्टार्टअप सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना मयूरने सांगितलं की, कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे बाईक होती. तिचा मायलेज कमी होता आणि त्यामुळे गाडीतून जास्त प्रमाणात धूर निघायचा. गाडीतून बाहेर येणारा धूर कमी करण्यासाठी आणि मायलेज कमी वाढवण्यासाठी मी प्रयत्न केला. तेव्हा माझा तो प्रयत्न यशस्वी ठरला. त्यानंतर आम्ही यावर अजून काम करायचे ठरवले. तसेच याचे पेटंट देखील आम्हाला मिळाल्याचे मयूरने सांगितले. भारत सरकारकडून मिळालेल्या मदतीने आम्ही कंपनी सुरु केल्याचे मयूरने नरेंद्र मोदींना सांगितले.
हे ही वाचा:
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
मयूरशी संवाद साधल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले असून या शोधामुळे खर्च कमी केला असून सोबत पर्यावरणासाठी देखील मोठं काम केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करावं तितकं कमी आहे, असेही मोदी म्हणाले. स्टार्ट अप्सच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.