विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची चौथी यादी जाहीर झाली आहे. चौथ्या यादीमध्ये दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. महायुतीमध्ये अजूनही काही जागांचा तिढा सुटायचा बाकी आहे, जस-जसा तिढा सुटतोय तस-तसे त्या जागेचे उमेदवार महायुतीकडून जाहीर करण्यात येत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित उमेदवारांचीही नावे लवकरच जाहीर होतील.
भाजपाच्या चौथ्या यादीमध्ये मीरा भाईंदरमधून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उमरेडमधून (अनुसूचित जाती) सुधीर लक्ष्मणराव पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या चार यादी जाहीर करण्यात आल्या आहेत, उर्वरित याद्यांची प्रतीक्षा आहे. २० ऑक्टोबर रोजी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती, त्यामध्ये एकूण २२ उमेदवारांची नावे होती. तर काल (२८ ऑक्टोबर) २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, भाजपाने आतापर्यंत १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत.
हे ही वाचा :
केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, १५० हून अधिक जखमी
धनत्रयोदशी: आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारी देवता धन्वंतरी
हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटाच्या उमेदवाराने घेतली माघार