इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे कंपनीच्या निर्मितीच्या काळात आठवड्याला ८० ते ९० तास काम करायचे. इतके काम करूनही ते कुटुंबासाठी वेळ काढू शकत होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ व्यतीत करण्यास प्राधान्य दिले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
कुटुंबासोबत कमी वेळ व्यतीत करण्यास मिळाला, याबद्दल पश्चाताप वाटतो का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर, नारायण मूर्ती म्हणाले, ‘ असे अजिबातच नव्हते. क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्त्वाची असते, असे मी नेहमीच मानत आलो आहे. मी सकाळी सहा वाजता ऑफिससाठी निघायचो ते रात्री सुमारे सव्वानऊ वाजेपर्यंत घरी यायचो. मी जेव्हा घरी पोहोचायचो, तेव्हा मुले दारात असत. सुधा, मुले आणि माझे सासरे गाडीमध्ये बसत असत. त्यानंतर जे खायला आम्हाला आवडत असे, ते खाण्यासाठी आम्ही जात असू. मग आम्ही खूप धमाल करत असू. ते दीड-दोन तास मुलांसाठी खूप आनंदाचे असत.’
हे ही वाचा:
जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना
स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर
कर्नाटक: वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म!
पश्चिम बंगालचे नाव बदला…ममता बॅनर्जी यांची मागणी!
७० तास कामापेक्षा कठोर मेहनत गरजेची
समाजातील गरीब वर्गांचे जीवन चांगले व्हावे, यासाठी कठोर मेहनत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, असे ते म्हणाले. निवृत्त होईपर्यंत ते आठवड्याला ८० ते ९० तास काम करत असत. ७० तास काम करणे महत्त्वाचे नाही तर कठोर मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. याचा अर्थ आपल्याला मोठे उत्पादक व्हावे लागेल. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. जशी दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानने घेतली होती, असेही नारायणमूर्ती यांनी सांगितले.