रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय झाला आहे.नारायण राणे यांनी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा या निवडणुकीतला अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ ठरला. कारण केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार नारायण राणे लोकसभेच्या मैदानात उतरले होते.राणे विरुद्ध महाविकास आघाडीतुन ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती.परंतु, या ठिकाणी विनायक राऊतांना पराभव पत्करावा लागला आहे.भाजपच्या नारायण राणेंनी त्यांचा पराभव केला आहे.नारायण राणे यांच्या विजयानंतर त्यांचे पुत्र, आमदार नितेश राणे यांनी आपल्या आईला उचलून आनंद व्यक्त केला.
हे ही वाचा:
अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !
मंडीच्या गादीवर ‘क्विन’च! कंगना रनौतकडून काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा परभव
नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले
विशेष म्हणजे नारायण राणे यांच्याकडून पराभव झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत हे या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. गेल्या १० वर्षांपासून या मतदारसंघात ते खासदार आहेत.२०१४ आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.त्यामुळे यंदाही राऊतांना विजय मिळेल अशी अटकळ बांधली जात होती.मात्र, नारायण राणेंनी ठाकरेंच्या मशालीवर फुंकर मारून ती विजवून टाकली आहे.विनायक राऊत यांचा पराभव करत नारायण राणे यांनी बाजी मारली आली.विनायक राऊतांच्या पराभवामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.