नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना मासे खाण्याचा सल्ला का दिला?

एका वाहिनीवरील कार्यक्रमात राणे यांनी खुमासदार शैलीत दिली उत्तरे

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना मासे खाण्याचा सल्ला का दिला?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मासे खाण्याचा सल्ला दिला आहे. यामागचे कारणही राणेंनी सांगितले. एका मराठी वाहिनीच्या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना भाजप नेते नारायण राणे यांनी वरील माहिती दिली. कोकणात याल तेव्हा मासे खाऊन जरूर जा, पण बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करू नका, असे ते म्हणाले. खुपते तिथे गुप्ते या अवधूत गुप्ते संचालित कार्यक्रमात नारायण राणे यांनी अनेक प्रश्नांची खुमासदार उत्तरे दिली. त्यात त्यांना उद्धव ठाकरेंना प्रतिकात्मक फोन करण्याची संधी देण्यात आली तेव्हा राणे यांनी हे आवाहन उद्धव ठाकरेंना केले.

 

यावेळी नारायण राणे उद्धव ठाकरेंना फोनवरून म्हणतात की, आपण कोकणात येता आणि बारसूच्या प्रकल्पाला विरोध करता. पण आपल्याला ठाऊक आहे की, शिवसेनेने नेहमीच कोकणातील जनतेला समर्थन दिले आहे. कोकणातील लोकांनीही शिवसेनेच्या वाढीत मोठा हातभार लावला आहे. याच कोकणातील लोकांसाठी बारसूची रिफायनरी आवश्यक आहे. तेव्हा त्याला विरोध करू नका. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात. बाळासाहेबांना कोकणाने भरपूर प्रेम दिले, विश्वास दिला. तेव्हा आपण इथे या मासे खा पण विरोध करू नका.

 

वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. कोकणात यायचेच असेल तर मासे खायला या, पण प्रकल्पाला विरोध करू नका, असा सल्ला राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला. महाराष्ट्रातील बारसू येथील रिफायनरीच्या जमिनीच्या सर्वेक्षणावरून उद्धव ठाकरे सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मात्र, उद्धव यांनी त्यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता, मग आता विरोध का, असा सवाल शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात आला.

हे ही वाचा:

सोंगाड्या, सवाल माझा ऐकामधील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपा अव्वल, तर फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती

झेलेन्स्कीना मिळाली ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांच्या आईकडून गोड भेट…

मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !

त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणतात की, केंद्राने आपल्या कार्यकाळात दोन वर्षे हा प्रकल्प का राबविला नाही? राज्यात भाजपचे सरकार आल्यावर लोकांकडून बळजबरीने जमिनी संपादित केल्या जात आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पासाठी बळाचा वापर करून लोकांच्या जमिनी संपादित केल्या जात असल्याच्या बातम्या मीडियातून आल्यावर उद्धव यांनी सरकारवर हल्ला चढवला.

Exit mobile version