पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा विरोध केला होता समर्थन केले नव्हते. शरद पवार मात्र हमासचे कौतुक करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशात चाललेले चांगले काम दिसत नसल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाच्या निमित्तानेही राणे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी ९६ कुळी मराठा आहे, कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मुंबईतील भाजप कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हमासचे कौतुक करणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगले काम केलेलं दिसत नाही का असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला. शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी, ना देशाच्या हिताचे बोलतात ना समाजाच्या हिताचे अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवारांना मोदी विरोधाची काविळ झाल्याने त्यांनी केलेली चांगली काम त्यांना दिसत नाहीत असे नारायण राणे म्हणाले.
१९९३ सालच्या बाँबस्फोटात तेरावा बाँबस्फोट मशिदीत झालाच नव्हता, मग त्यावर त्यावेळचे मुख्यमंत्री खोटं का बोलले? एका ठराविक समूदायाच्या लोकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी का केला? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.
पवार यांनी इस्त्रालय आणि हमास बाबत केलेली टीका चुकीची आहे. इस्त्रायलवर दहशतवादी हल्ल्याबाबत मोदींनी भूमिका मांडली होती. पॅलेस्टिनविरोधातली ती भूमिका नव्हती. शरद पवारांनी देशात आणि राज्यात बरीच पदं भूषवली आहेत. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की १९९३ ला साखळी बाॅम्बस्फोटात अनेक मृत्यू झालेत, तेव्हा मशिदीमध्ये बाॅम्बस्फोट झाला अशी अफवा त्यांनी पसरवली? पवार साहेब देश प्रथम अशी भूमिका कधी घेणार आहेत?
हे ही वाचा:
दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच; सौम्या विश्वनाथन प्रकरणाने करून दिली आठवण
एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
पुण्यातील ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर
गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
केंद्र सरकारनं जुलै १९९३ मध्ये एन.एन.व्होरा यांची समिती नेमली. या समितीने दाऊद आणि मेमन गॅंगचे राजकारण्यांशी त्यांचे सुमधूर संबंध असल्याचं अहवालात सांगितलं होतं. पवार साहेबांना माहिती आहे त्यात कोणाकोण होतं ते. व्होरा समितीत काँग्रेसच्या नेत्यांची दाऊदशी संबंध असलेली नावं आहेत. मी काँग्रेसमध्ये असताना नावं देखील सांगितली होती. पवार साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता जे जनतेच्या हिताचं ना राष्ट्राच्या हिताचं असतं.
जनतेला वाहून घेतलेल्या लोकांवर तुम्ही टीका करता. गेल्या ९ वर्षात ५५ योजना मोदींनी जाहीर केलेल्या आहेत. असं असताना मोदी आपल्याला गुरु मानतात तरीही आपण असं वागता? आपण समजून घ्या… तुम्ही हमासची बाजू घेता आहात. व्होरा समितीची मी माहिती काढली, चांगल्याला चांगलं म्हणणं अभिप्रेत आहे. आम्ही टीका ऐकणाऱ्यांमधले नाही, जशास तसे उत्तर दिलं जाईल. पवार आता कोणत्या क्षेत्रासाठी कामं करतायत? आता ते फक्त पार्टी वाचवण्याचं काम करत आहेत. बाॅम्बस्फोट त्यांच्याच कार्यकाळात का होतात? यासंदर्भात संशोधन करायला हवं. दहशतवादाविरोधात आम्ही कोणत्याही देशाला मदत करण्यास तयार आहे, ते पुढे म्हणाले.
मला कुणबी प्रमाणपत्र नको!
मराठा आणि कुणबी याच्यात फरक आहे. मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा. जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. मी भरपूर अभ्यास केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे घटना काय सांगते. मी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको. कुठलाही मराठा, कुणबी प्रमाणपत्र घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाशी जो संबंधित आहे.त्याला शिक्षा होणारच मग तो कोणत्याही पक्षाचा असो.तसेच ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे याना काही काम नसल्याने फक्त बिनबुडाचे आरोप करण्याचं काम त्या करत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.