“एकनाथजी योग्य निर्णय नाहीतर आनंद दिघे झाला असता”

“एकनाथजी योग्य निर्णय नाहीतर आनंद दिघे झाला असता”

राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरातमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ठाकरे सरकार पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी ट्विट केले आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता,” असं नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

हे ही वाचा:

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल असून यामुळे शिवसेनेत फूट पडणार का या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत काही आमदार आहेत. हे १३ आमदार कोण हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे त्यांची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. तर ठाकरे सरकार कोसळणार का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

Exit mobile version