24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषनंदुरबारला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी

नंदुरबारला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

Google News Follow

Related

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आदिवासी खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणारी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारण्याचा विचार असून, त्यात आदिवासी खेळाडूंना सांघिकसोबत वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे धडे दिले जातील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. नंदुरबार येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

हेही वाचा..

४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

आदित्य एल-१चे पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाऊल !

‘आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही’

ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !

यावेळी बोलताना मंत्री गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देणे व क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर ती नंदुरबारमध्ये सुरू करण्याची बाब विचाराधीन आहे. त्यात पाचवी च्या वर्गापासून प्रवेश दिला जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी व २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा व काटकता असते, धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. सांघिक प्रकाराबरोबरच वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत सामुहिक क्रीडा प्रकारांसोबत कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्विमिंग या वैयक्तिक खेळांचाही समावेश असेल. या वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळानुसार स्वतंत्र प्रशिक्षकाची नियुक्ती सोबतच त्यांच्या दर्जेदार व पोषक आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनी परिसरात वसतिगृहाच्या सुविधा असणार आहेत. तसेच या खेळाडू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणांमध्ये अद्ययावत क्रीडा साहित्याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करता येणार असल्याचेही डॉ गावित यांनी यावेळी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा