असे काय झाले की नांदिवली संतापली?

असे काय झाले की नांदिवली संतापली?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नांदिवली भागातील स्थानिक असंख्य समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांनी आता थेट आंदोलनाचाच पवित्रा घेतला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर हे लोक संतप्त झाले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य व्यवस्था आणि भोंगळ कारभार याचा फटका नेहमीप्रमाणे यंदाही नांदिवली भागातील रहिवाशांना बसला. पावसाच्या पाण्याने नागरिकांची दाणादाण उडवून दिली. या ठिकाणी असा कोणताही एक परिसर नव्हता ज्या ठिकाणी पाणी साचले नाही. स्वामी समर्थ मठ परिसरातील रस्त्यावर तर गुडघाभर पाणी साचलेले होते. परिणामी इथला वीज पुरवठाही खंडीत झाल्याने या ठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे समर्थनगर रहिवाशी संघाच्या स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या ठिकाणी असणारी अपुऱ्या गटारांची समस्या, अनधिकृत बांधकामांना आळा न घातल्याने रोखला गेलेला पाण्याचा मार्ग, इमारतींच्या आवारापेक्षा रस्त्यांची वाढत गेलेली उंची आदी कारणांमुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या वर्षागणिक वाढत चालल्याचेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

हे ही वाचा:
पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

पुण्यात चारनंतर आराम

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?

हिंदू देवस्थानांबाबत कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय!

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वोदय पार्क ते नांदिवली नाला येथे दोन्ही बाजूंनी गटारे बांधणे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई करणे, ज्या नवीन बांधकामांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करणे, खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करणे, सखल भागात लावण्यात आलेले डीपी महावितरणने त्वरित उंच करावेत, आदी महत्त्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. ही समस्या लवकरच सोडवावा, अन्यथा नागरिक जनआंदोलन करणार असल्याचे उपोषणकर्ते समर्थनगर संघाच्या रहिवाशांनी मनोज घरत यांनी सांगितले.

Exit mobile version