नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

ज्या संस्थेतून शिक्षण घेतलं त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी मंगळवारी आयआयटी मुंबईला ३१५ कोटी रुपये देणगीची घोषणा केली. नीलेकणी यांनी १९७३ मध्ये आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला होता आणि तिथूनच त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची बॅचलर पदवी प्राप्त केली. आज ५० वर्षांपूर्वी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी नीलेकणी यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता.

 

नंदन नीलेकणी हे आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आहेत, गेल्या ५० वर्षांपासून ते या संस्थेशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात असतात. नीलेकणी यांनी १९७३ मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक संस्थेसोबत असलेल्या संबंधाला ५० वर्षे पूर्ण झाली. प्रथम एक विद्यार्थी म्हणून, आणि नंतर २०११-२०१५ पर्यंत तिच्या प्रशासक मंडळावर राहण्यापर्यंत आजवर ते संस्थेशी जोडले गेलेले आहेत, त्याचीच एक पोचपावती म्हणून नंदन नीलेकणी यांनी मुंबई आयआयटीला ३१५ कोटी रुपये दान केले आहेत.

 

आयआयटी मुंबईने जारी केलेल्या निवेदनानुसार, याआधीदेखील नीलेकणी यांनी आयआयटीला ८५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. आता दिलेली रक्कम मिळून नीलेकणी यांनी आतापर्यंत संस्थेला एकूण ४०० कोटी रुपयांची मदत केली आहे. यापूर्वी दिलेला निधी हा नवीन वसतिगृहे बांधणे, स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला वीजपुरवठा करणे आणि देशाचे पहिले विद्यापीठ इनक्यूबेटर स्थापित करणे यासाठी होते, अशी माहिती आयआयटी मुंबईने दिली.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस म्हणाले; बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकार सदैव पाठीशी !

अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले

संभाजीनगरचे नागरीक तहानलेले; पण आयुक्तांच्या वाढदिवसावर पाण्यासारखा पैसा खर्च

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज

आपल्या भविष्यातील योजना मांडताना, आयआयटी मुंबईने पुढील ५ वर्षांत ४ हजार १०६ कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. नीलेकणी यांनी दिलेली देणगी एक मदत म्हणून काम करेल आणि संस्थेला निर्धारित उद्दिष्टं साध्य करण्यासाठी योजना सुरू करण्यास मदत करेल, आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version