25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषफॅनला मारल्याप्रकरणी नाना पाटेकर यांची माफी!

फॅनला मारल्याप्रकरणी नाना पाटेकर यांची माफी!

मी असं कधीच वागत नाही,कोणावरही हात उचलत नाही, नाना पाटेकर

Google News Follow

Related

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर एका घटनेमुळे चर्चेत आले.शूटिंग दरम्यान चाहत्यावर हात उगारल्याचा नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.नाना पाटेकर यांच्या अशा वागण्याने त्यांचे चाहते नाराज झाले.पण आता या व्हिडीओमध्ये घडलेली घटना ही शूटिंगचा भाग असल्याचं सांगत नानांनी एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण देत माफी मागितली.

अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या सिनेमाचं शूटिंग करत आहेत.’जर्नी’ या सिनेमाचं शूटिंग वाराणसी येथे चालू होत.सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांच्या एक चाहता सेल्फी काढण्यास पुढे येतो.त्यानंतर नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात त्या चाहत्याला कानाखाली वाजवली.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.नाना पाटेकरच्या अशा वृत्तीमुळे चाहते वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ लागले.याबाबत नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केलीन आहे.

याप्रकरणी नाना पाटेकरांनी एक व्हिडीओ शेअर केला.नाना पाटेकर म्हणाले,”व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असलेली घटना ही माझ्या आगामी ‘जर्नी’ या सिनेमाचा भाग आहे. या सिनेमात मी डोक्यावर टोपी घातली असून एक व्यक्ती मला म्हणत आहे,”ए म्हाताऱ्या तुझ्या डोक्यावर असलेली टोपी विकायची आहे का?”. त्यावर मी त्या व्यक्तीला मारतो आणि त्याला पळवून लावतो”.

हे ही वाचा:

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!

शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

न्यूजक्लिक प्रकरणी अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमला समन्स

नाना पाटेकर म्हणाले की,”जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दृश्याची तालिम सुरू होती. आमची दुसरी रिहर्सल होणार होती. दिग्दर्शकाने मला सुरुवात करायला सांगितले.या सिन साठी दुसरा मुलगा येणार होता.तो मुलगा कोण होता हे मला माहित न्हवते.अचानक एक मुलगा आणि त्याने फोटो काढायला सुरवात केली.मला वाटले की, तो क्रूपैकी एक आहे म्हणून मी त्याला दृष्यानुसार थप्पड मारली आणि मी त्याला निघून जाण्यास सांगितले.नंतर मला कळले की, तो मुलगा आपल्या क्रूचा भाग नाहीये.त्यानंतर मी त्याला परत बोलवणार होतो परंतु तो पळून गेला.क

दाचित त्याच्या मित्राने हा व्हिडिओ शूट केला असेल.नाना पाटेकर पुढे म्हणाले, मी असं कधीच वागत नाही. कधीही कोणावर हात उचलत नाही. उलट लोकांवर खूप प्रेम करतो. पण नकळत झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो.तसेच बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही शूटिंगदरम्यान मला अनेक लोकांकडून पाठिंबा मिळत आहे. स्थानिक लोक कोणत्याही प्रकारची तक्रार करत नसल्याचेही नाना पाटेकर यांनी सांगितले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा