आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो एक्स्प्रेस ही ट्रेन भाविकांना घेऊन रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या ट्रेनला झेंडा दाखवण्यात आल्यानंतर ट्रेन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाविक उपस्थित होते.
हेही वाचा..
केजारीवालांची प्रकृती व्यवस्थित
मनोरमा खेडकरांचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर!
लोकसभेत पराभूत खासदारांचा अजूनही सरकारी बंगल्यात ठिय्या, बजावली नोटीस !
३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ !
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्याच्या मनात पंढरीला जाण्याचा भाव आहे, मात्र काही नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी ही खास सोय करण्यात आली.
वारकरी संप्रदायाने भागवत धर्माची पताका उंच ठेवली आहे. त्याचा सर्वात मोठा मेळा पंढरीत भरत असतो. पंढरीची वारी मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे, आध्यात्मिक स्वाभिमान आहे. विठूमाउलीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक पंढरीत दाखल होत असतात. आज मुंबईतून ही सोय करण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.