31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषकुनो अभयारण्यातील बछड्यांचे होणार आहे बारसे... चला नावे सुचवा!

कुनो अभयारण्यातील बछड्यांचे होणार आहे बारसे… चला नावे सुचवा!

सरकारी वेबसाईटवर मागविली नावे, बक्षीसही मिळणार

Google News Follow

Related

कुनोच्या अभयारण्यात पाच दशकांनंतर पहिल्यांदाच चित्याचा जन्म झाल्याने सगळीकडे आनंद व्यक्त केला जात आहे. एक नाही दोन नाही तर कुनो अभयारण्यात चार छोटे पाहुणे आल्यामुळे जास्त आनंद झाला आहे. आता या चार बछड्यांच्या नामकरणाची तयारी सुरु झाली आहे.

चित्ता प्रेमींनी या बछड्यांची नवे पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे बघून सरकारनेही या बछड्यांसाठी नवे सुचवण्यासाठी सांगितली आहेत. या बछड्यांची नवे एका वेबसाईटवर पाठवता येणार आहेत. कुनो नॅशनल पार्कमधील नामिबियातील मादी चित्ता सियायाने गेल्या बुधवारी ४ बछड्याना शावकांना जन्म दिला. सियाच्या गर्भधारणेची माहिती कुनो नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनाला २० दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू होते. सियाने चार गोंडस बछड्याना जन्म दिल्याच्या बातमीनंतर देशातील सर्वानाच आनंद झाला आहे.

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून सुमारे ७० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्ता देशात आणल्याचा आनंद अजूनही लोकांच्या चेहऱ्यावरून ओसरला नव्हता. आता चार बछडे आल्यामुळे त्यांना बघण्याची उत्सुकता लोकांना लागली आहे. या बछड्यांची नवे आतापासूनच लोकांनी सुचवलीला सुरुवात केली आहे. स्वातंत्र्याच्या या अमृततुल्य कार्यक्रमात कुणी आझाद, भगत, राजगुरू आणि सुखदेव यांची नावे ठेवण्याचे सुचवत आहेत, तर कुणी इतर स्वातंत्र्यसैनिक आणि शूर स्वातंत्र्यसैनिकांची. दुसरीकडे, काही लोक त्यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न किंवा देशातील नद्यांच्या नावावर ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

हे ही वाचा:

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

प्रोजेक्ट टायगर साजरी करतोय पन्नाशी

भारतात आहेत १०० वर्षांपेक्षा जुनी २३४ मोठी धरणे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन लेनमुळे प्रवासाचा वेळ २०-२५ मिनिटांनी कमी होणार

नामकरण स्पर्धा

लोकांचा उत्साह पाहून केंद्र सरकारने त्यांच्या MyGov.in प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची नावे देण्याची मोठी स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती ३० एप्रिलपर्यंत या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाऊन चार बछड्यांच्या नावांबाबत आपल्या सूचना देऊ शकेल. यादरम्यान, यामधून जे नाव निवडले जाईल, त्याला ते सुचविल्याबद्दल बक्षीसही दिले जाईल.

मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग

उत्साह इतका आहे की गेल्या दोन दिवसांत नामकरणासाठी केवळ एक हजारांहून अधिक नावे सुचली आहेत. नामिबियातील चित्त्यांच्या नामकरणाप्रमाणेच या पिल्लांच्या नामकरणाबाबतही मोठ्या संख्येने लोकांचा मोठा सहभाग असेल असे मानले जात आहे. यासोबतच देशभरातील शाळांमध्ये त्यांच्या नामकरणाबाबत स्पर्धा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ज्याची लवकरच घोषणा होऊ शकते.

साशाच्या मृत्यूचे दुःख

या अंडायच्या बातमी बरोबरच चित्तप्रेमींना कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ‘साशा’चा मृत्यू झाल्याचेही दुःख आहे. साशा किडनीच्या आजाराने त्रस्त होती . नामिबियातून आणलेल्या ८ चित्त्यांमध्ये ‘साशा’चा समावेश होता. १९५२ मध्ये चित्ता अधिकृतपणे देशातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची संख्या सध्या देशात २३ आहे, तर अलीकडेच चार पिल्ले जन्माला आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा