महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठास ‘रतन टाटां’चे नाव!

रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठास ‘रतन टाटां’चे नाव!

कौशल्य विद्यापीठास जेष्ठ दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्य सरकराने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध असे १९ निर्णय घेण्यात आले. यामध्ये ‘भारताचे रतन’ उर्फ रतन टाटा यांच्या स्मरणार्थ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचे घोषित केले आहे. ‘पद्मविभूषण रतन टाटा विद्यापीठ’ असे आता विद्यापीठाचे नाव असणार आहे.

हे ही वाचा : 

खर्गेंकडून जमीन परत करणे म्हणजे भ्रष्टाचाराची कबुली!

मुंबईहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियासह इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी

बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपी अल्पवयीन नाही!

महायुती सरकारचा मोठा निर्णय; मुंबईकर झाले ‘टोल’मुक्त!

तसेच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत विविध असे एकूण १९ निर्णय :

१) मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

२) आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

३) समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

४) दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

५) आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

६) वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

७) राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

८) पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

९) खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

१०) राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

११) पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

१२) किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता (सहकार)

१३) अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

१४) मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

१५) खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

१६) मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

१७) अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

१८) उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

१९) कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

 

Exit mobile version