महाविकास आघाडीने घेतला ‘मनसे’सारखा निर्णय

महाविकास आघाडीने घेतला ‘मनसे’सारखा निर्णय

ठाकरे सरकारने आता मराठीचा अट्टाहास ठेवत दुकानांबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुकानांच्या, गाड्यांच्या पाट्या या मराठीत हव्या अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आली होती. तसेच राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा नियम असतानाही अनेकांनी या नियमाला बगल दिल्याचे चित्र राज्यात आहे. मात्र, आता राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतून दिसणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने अखेर हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही राज्यातील सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठीत असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी होत नव्हती. तसेच बहुतांश दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आज झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत मराठीत- देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७’ हा अधिनियम लागू होतो. यामधून दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते.

यासंबंधीच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. तसेच त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्यानुसार आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!

राज्यावर घोंगावतय ड्रोन हल्ल्याचे संकट  

सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!

एकीकडे राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नाहीत. नियमांमधून पळवाट काढून दुकानांवर इंग्रजी पाट्या आणि त्याखाली छोट्या आकारत माराठी नाव लिहिले जात होते. मात्र, आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत.

Exit mobile version