लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

मुंबईतील नायर रुग्णालयातील डीनची तातडीने बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर डीनची बदली करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

विद्यार्थीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आणखी १० विद्यार्थीनींकडून तक्रार करण्यात आली. विनयभंगाच्या तक्रारीनंतर सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून तपास करण्यात आला. यानंतर महिला केंद्राकडून तपास सुरु असतानाच मुंबई महापालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा : 

अयोध्या बलात्कार प्रकरण : राजू खानचा डीएनए नमुना गर्भाशी जुळला

खटला दाखल होताच जमिनी परत करण्याचा निर्णय

संभाजी राजेंच्या संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता!

समाजवादी आमदार मेहबूब अली यांच्यावर गुन्हा दाखल

मात्र, केवळ निलंबन नको तर बदली करण्याची मागणी विद्यार्थिनींकडून करण्यात आली. निलंबन प्राध्यापकाला कॉलेजच्या आवारातच शासकीय घर दिल्याचा मनसेनेही आरोप केला. संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नायरच्या डीनची तत्काळ बदली करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले.

प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर नायरच्या डीनची बदली करण्यात आली. आरोग्य क्षेत्रातील अशा घटना गंभीर असून कडक कारवाई करू, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Exit mobile version