21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेष  युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

  युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात नायब तहसीलदार मशिदीत नमाज पढत असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आशिष गुप्ता असे त्याचे नाव असून त्याने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर एका मुस्लिम महिलेला आपली दुसरी पत्नी म्हणून करून घेतले आहे. या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तिथे तहसीलदार बलराम गुप्ता यांनी भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार मौहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

हेही वाचा..

येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत

वर्ल्ड कप फायनलमध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यातून बेंच, जॅकेट

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

चौदावा केशवसृष्टी पुरस्कार डॉ. बालाजी आसेगावकर यांना प्रदान

येथे हा नायब तहसीलदार आपली ओळख लपवून दोन दिवस नमाज अदा करण्यासाठी जात होता. त्याने आपण कानपूर येथील असून आपले नाव मोहम्मद युसुफ असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने आपण मौधा तहसीलचे नायब तहसीलदार असल्याचे सांगितल्याने लोकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर मशीदीच्या व्यवस्थापनाने याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली. २५ डिसेंबर रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी जबाब नोंदवले.  याबद्दल मशिदीतील मौलवी मुहम्मद मुश्ताक यांनी सांगितले की, एक अज्ञात व्यक्ती वारंवार नमाज अदा करण्यासाठी येत होता. त्याने आपले नाव मोहम्मद युसूफ असून आपण कानपूरचे रहिवासी आहोत असे सांगितले. शिवाय मौदाहाचा नायब तहसीलदार असल्याचे सुद्धा सांगितले होते. त्यामुळे आम्ही संबंधित अधिकाऱ्याना सावध केले. चौकशी करण्यासाठी रात्री तहसीलदार आले. त्यांनी सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.

बजरंग दलाचे मौधा शहराचे माजी जिल्हा संयोजक आशिष सिंह यांच्या म्हणण्यानुसार, हि व्यक्ती मोहम्मद युसूफ नसून मौधा तहसीलमध्ये तैनात असलेले नायब तहसीलदार आशिष गुप्ता आहे. तो कानपूर जिल्ह्यात राहतो आणि आधीच दोन मुलांसह विवाहित आहे. मात्र, अलीकडेच त्याने मौधा येथील एका मुस्लिम महिलेसोबत लग्न करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला आणि कचरिया बाबा मशिदीत नमाज अदा करण्यास सुरुवात केली. याबाबत प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाने केली आहे.अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अरुण मिश्रा म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी राजेश मिश्रा म्हणाले, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी मशिदीतील एका मौलवीने याबाबत सांगितले. त्यानंतर  तहसीलदार आणि इतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर तपास करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या तपासादरम्यान आपण उर्दू शिकण्यासाठी मशिदीला भेट दिल्याचे गुन्हेगाराने कबूल केले असून त्याचा अहवाल उच्च अधिकाऱ्यांना सादर केला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा