कुस्तीत ऑलम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारे जागतिक दर्जाचे पैलवान खाशाबा जाधव यांच्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचे दिग्दर्शन सैराट, नाळ, झुंड, आणि फेंड्री फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहे. आपल्या दिग्दर्शनाची वेगळीच छाप पडणाऱ्या मंजुळे यांनी कोल्हापूर मध्ये कुस्तीच्या आखाड्यातच याची नुकतीच घोषणा केली आहे. या सिनेमाची चित्रपटाच्या चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना याची उत्सुकता लागून राहिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये उमलवाड या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवण्यात येते. या यात्रेमध्ये भव्य कुस्त्यांचे आयोजन केले जाते याच कुस्ती मैदानात नागराज यांनी हजेरी लावली होती तेव्हा त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. खाशाबा जाधव हे जागतिक दर्जाचे पैलवान होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती . म्हणूनच त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा निणय मी घेतला आहे. माझ्यासाठी हि खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या संदर्भात मी माहिती देईन या सिनेमाचे शूटिंग देखील कोल्हापुरातच होऊ शकते आणि त्या चित्रपटातून ‘ प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळेल’ असेही पुढे नागराज मंजुळे म्हणाले. या आधी कुस्ती या खेळावर आमीर खानचा दंगल हा चित्रपट आला होता.
हे ही वाचा:
खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!
आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…
संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!
शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?
कोण होते खाशाबा जाधव ?
खाशाबा जाधव हे महान कुस्तीपटू होते, आपल्या देशाला पहिल्या ऑलम्पिक पदकाचा मान हा खाशाबा जाधव यांच्यामुळे मिळाला. खाशाबा जाधव हे एकमेव कुस्तीतील ऑलम्पिक विजेते होते. भारत सरकारतर्फे त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. खाशाबा हे अत्यंत चपळ असल्यामुळे ते इतर पैलवानांपेक्षा वेगळे होते. इग्लिश प्रशिक्षक रिस गार्डनर यांनी त्यांच्यामध्ये हाच गुण हेरला होता. त्यांना १९४८ साली त्यांनी त्यासाठी प्रशिक्षण दिले होते. १९४८ साली त्यांनी लंडन मध्ये उन्हाळी ऑलम्पिक स्पर्धेत फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक पटकावला.होता. तर १९५२ साली हेलसिंकी उन्हाळी ऑलम्पिक स्पर्धेत ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्री स्टाइल या प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. नागराज मंजुळे हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यासाठी आणि त्यांच्या अनोख्या दिग्दर्शन शैली साठी प्रसिद्ध आहेत. आता खाशाबा जाधव यांच्या या जीवनकथेवर आधारित चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.