नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!

दंगलीच्या घटनेनंतर हिंदूंचे हिंदूंना आवाहन

नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून झालेली दंगल ही सुनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपास सुरु आहे. या प्रकरणी आतापर्यंत १२२ जणांना अटक करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. या दंगलीत झालेले नुकसान मुस्लिमांचे नाहीतर केवळ हिंदूंचे झाले. हिंदूंची वाहने, दुकाने जाळण्यात आली, हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली.

झालेल्या नुकसानावरून केवळ जाणूनबुजून हिंदूंना लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपुरातील हिंदू जागा होत आहे. आमच्याच राज्यात राहून दंगली घडवणाऱ्या अशा औरंगप्रेमी टोळीवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन हिंदू करत आहेत. दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या, असे फलक हाती घेवून हिंदूंना जागृत करत आवाहन केले जात आहे.

दंगलीच्या घटनेनंतर नागपुरातील हिंदू हातामध्ये फलक घेवून चौकाचौकात उभे राहून आवाहन करत आहे. काहीही खरेदी करायचे असेल तर हिंदूंकडून करण्याचे आवाहन हिंदूंकडून करण्यात आले आहे. ‘हिंदुनी खरेदी हिंदूंकडूनच करावी’, ‘वस्तू भाजीपाला किंवा धान्य, खरेदीसाठी द्या हिंदूंना प्राधान्य’, ‘आपला पैसा आपल्या हितासाठी, हिंदूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी’, ‘खरेदीच्या आधी एकच काम, म्हणायचं जय श्री राम’, असे मजकुराचे फलक हाती घेवून हिंदू तरुण हिंदुना जागे करण्याचे काम हिंदू करत आहे.

हे ही वाचा : 

केसरी चैप्टर २’ चा टीझर प्रदर्शित

‘कचनार’ – प्रकृतीचा अनमोल खजिना, अनेक आजारांवर रामबाण उपाय

आला उन्हाळा तब्बेत संभाळा !

मुंबईत १३ महिन्यांत ६५ लाख वाहन चालकांनी नियम मोडले

दरम्यान, या दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे. तर एका आरोपीची दोन दुकाने सील करण्यात आली आहेत.  या प्रकरणातील काही दंगेखोर तेलंगना, आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये फरार असल्याचीही माहिती समोर आली आहे.  पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पवार झाले आता पडळकर-पाटलांच्यात खडाखडी ! | Amit Kale | Gopichand Padalkar | Jayant Patil |

Exit mobile version