29 C
Mumbai
Monday, March 24, 2025
घरविशेषनागपूर हिंसाचार: दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करू, पैसे दिले नाहीत तर त्यांच्या मालमत्ता...

नागपूर हिंसाचार: दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करू, पैसे दिले नाहीत तर त्यांच्या मालमत्ता विकू!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Google News Follow

Related

नागपूरामध्ये झालेल्या हिंसाचारात जे काही नुकसान झालेले आहे ते सर्व दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. जर दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची मालमत्ता विकली जाईल. राज्यात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. नागपूरमध्ये झालेल्या संपूर्ण घटनेचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. या बैठकीला नागपूरच्या आयुक्तांसह सर्व अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण घटनाक्रम आणि केलेली कारवाई या  आढावा बैठकीतून घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची आणि कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विहिंपच्या आंदोलकांनी धार्मिक मजकूर असलेली चादर जाळली, असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मिडीयावर एक अपप्रचार केला आणि संध्याकाळी जमाव जमा झाला. त्यानंतर दगडफेक केली, गाड्यांवर हल्ला केला, लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी चार-पाच तासांमध्ये या दंगलीला आवर घातला.

सीसीटीव्ही आणि व्हिडीओच्या माध्यमातून दंगलीतील आरोपींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत १०४ लोकांची ओळख पटली असून ९२ लोकांना अटक केली आहे, ज्यामध्ये १२ जण १८ वर्षांच्या झालील असल्यामुळे त्यांच्यावर त्यापद्धतीची कारवाई करण्यात आली आहे. अजूनही ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

हे ही वाचा : 

अल्काराझ दुसऱ्या फेरीत गाफिनकडून पराभूत

औरंग्याची कबर हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

आयपीएल २०२५ : दहाव्या षटकानंतर चेंडू बदलण्याची परवानगी!

छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण

दंगे करणारा व्यक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्या अशा प्रत्येकावर कारवाई होणार आहे, पोलिसांनी तशी कारवाई सुरु केली आहे. ज्या लोकांनी ही घटना घडावी आणि वाढावी म्हणून सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. त्या सर्वांना दंगेखोरांसोबत सहआरोपी बनवले जाणार आहेत. जवळपास ६८ पोस्टची ओळख पटवली असून त्या डीलेट केल्या गेल्या आहेत.

भडकवणारे पॉडकास्ट केले, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवल्या, अशा सर्वांवर कारवाई होईल. नुकसान झालेल्यांना येत्या तीन-चार दिवसात नुकसान भरपाई देण्यात येईल. आत जे काही नुकसान झालेले आहे ते सर्व दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. जर दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची मालमत्ता विकली जाईल. ते पुढे म्हणाले, दंगलीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग झालेला नाही, मात्र त्यांच्यावर दगड फेक झाली. तसेच नागपूर आता शांत आहे, घटना ही एका भागात घडली, पंतप्रधान मोदींचा दौरा व्यवस्थित पार पडेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा