नागपुरातील कालच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचार प्रकरणी ८० जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोणालाही सोडण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याच दरम्यान, भाजपा मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. दंगेखोरांवर अशी कारवाई होईल की त्यांना पाकिस्तानचा अब्बा आठवेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत.
नागपुरात घडलेल्या कालच्या घटनेचा घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितला. यावरून सुनियोजित असल्याचे दिसून येते. या प्रकरणी आता संपूर्ण चौकशी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुणीही येवून काहीही घडवणे हे सोप्पे नाहीये, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला काय वाटत सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार?, पाकिस्तानचा अब्बा आठवेल अशी कारवाई आता होणार आहे. यानंतर यांना कळेल पोलिसांवर हल्ला केल्यानंतर काय होत ते.
हे ही वाचा :
फीफा विश्वचषक पात्रता फेऱ्यांसाठी मेस्सीला विश्रांती
बोटाच्या शस्त्रक्रियेनंतर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाईसाठी संशयास्पद वस्त्यांमध्ये कॉम्बिग ऑपरेशन करा
नागपूरची घटना सुनियोजित, ट्रॉलीभर दगड, मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त!
हिंदू संघटनांनी केलेल्या आंदोलनाची काही चूक आहे का?, जे लगेच पोलिसांवर हल्ला करून वातावरण खराब करणार. मला एक आश्चर्य वाटले, त्याठिकाणच्या एका भागावर विशिष्ठ समाजाची लोकं गाडी पार्क करतात. मात्र, काल तिथे कोणतीच पार्किंग केली गेली नाही. हे सर्व सुनियोजित होते का?, मग ट्रकभर दगड आले कुठून? या पाठीमागचे उद्दिष्ट काय? हे टप्प्या टप्प्याने तपासात समोर येईल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिहादी मानसिकतेचे जेजे असे लोक आहेत त्यांना बरोबर चोप देणार. आमच्या राज्यात राहून महाराजांबाबत विरोधात भूमिका घेणे शक्यच नाही, त्यांना काय शासन करायचे ते आमच राज्य सरकार करेल.