वाहने पेटवली ती हिंदूंची, घटनेवेळी मुस्लिमांचे एकही वाहन पार्क नव्हते!

भाजप आमदार प्रवीण दटके यांनी दिली माहिती 

वाहने पेटवली ती हिंदूंची, घटनेवेळी मुस्लिमांचे एकही वाहन पार्क नव्हते!

छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी केलेल्या निदर्शनानंतर काल (१७ मार्च) संध्याकाळी नागपूरमध्ये हिंसक संघर्ष झाला, ज्यामध्ये ३० हून अधिक लोक जखमी झाले. तर सुमारे २५ दुचाकी आणि तीन कार पेटवून देण्यात आल्या. शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या मोठ्या संघर्षानंतर सुमारे ८० हून अधिक दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच दरम्यान, भाजपाने हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे.

घटनास्थळाला भेट देणारे नागपूर मध्यचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी दावा केला की हिंसक संघर्ष पूर्वनियोजित होता. प्रवीण दटके म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित होते. काल सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांनी मध्यस्थी केली आणि कायद्यानुसार आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. पण ही घटना रात्रीच्या वेळी सुनियोजित पद्धतीने घडवली गेली.

यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत, तिथे हिंदू आणि मुस्लिम दोघांचीही घरे आहेत, परंतु फक्त हिंदूंच्या घरांचेच नुकसान झाले आहे. ही घटना घडवण्यासाठी नागपूरबाहेरील लोक आले होते. प्रत्येकाकडे व्हिडिओ आहेत. हे सर्व प्लानिंग करून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्र्यांचा जखमी पोलिसांशी संवाद; कामाचे कौतुक करत बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

हे तर घडणारच होते…

‘हिंदू तालिबान’ शब्दावरून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाईंविरोधात तक्रार

‘काँग्रेसच्या सत्तेत मणिपूर जळत राहिला, पण काँग्रेसने लक्ष दिले नाही’

ते पुढे म्हणाले, जेवढ्या गाड्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व हिंदूंच्या आहेत, त्यात एकही मुस्लिमांची नाही. हिंसाचार झालेल्या एका ठिकाणी हिंदू-मुस्लिमांच्या गाड्या पार्क होतात. पण घटनेच्या दिवशी मुस्लिम लोकांचे एकही वाहन त्याठिकाणी पार्क केलेले नव्हते. याचा अर्थ हे सर्व सुनियोजित होते. याबाबत मी अधिक माहिती घेत आहे.

तहसील पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. प्रवीण दटके यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आणि म्हटले की पोलिस विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना केली. मी तेथील नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळी दंगलखोरांकडून महिलांना शिवीगाळ, सीसीटीव्ही फोडणे, तिसऱ्या मजल्यावर दगडफेक, हिंदूंचे वाहन, हिंदूंचे दवाखाने जाळण्याचा प्रकार केला गेला. या घटनेची सखोल चौकशीची आणि यामध्ये दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले.

हे तर घडणारच होते... | Dinesh Kanji | Nagpur Violence | Waqf Board | Chhava | Aurangzeb |

Exit mobile version