नागपूर येथील हिंसाचाराचे बांगलादेशी कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर हिंसाचारानंतर मुंबईत पळून आलेल्या एका बांगलादेशी तरुणाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणाकडे पोलिसांना मिळून आलेल्या आधारकार्डमध्ये नागपूरचा पत्ता आढळून आला आहे.अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणाचा नागपूर हिंसाचार संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजिजुल रहमान असे अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी तरुणाचा नाव आहे.अजिजुल हा मागील ६ ते ७ वर्षांपासून नागपूर मध्ये सहकाऱ्यासह बेकायदेशीररीत्या राहण्यास होता.नागपूर हिंसाचार उसळला त्या वेळी अजिजुल हा नागपूरमध्ये होता, हिंसाचारानंतर त्याने नागपूर मधून पळ काढला आणि काही दिवस तो पुण्यात येऊन राहत होता.तेथून तो मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ला मिळाली होती.
गुन्हे शाखा कक्ष २च्या पथकाने बुधवारी रात्री दादर रेल्वे स्थानक येथे सापळा लावून अजिजुल रहमान या बांगलादेशी तरुणाला अटक केली.त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तो मागील ६ ते ७ वर्षांपासून नागपूर येथे राहण्यास असून त्याच्याकडे मिळून आलेल्या आधारकार्ड मध्ये नागपूरचा पत्ता आढळून आला असून तो मूळचा बांगलादेशाचा नागरिक असल्याचे चौकशीत समोर आले आहे. गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने त्याला अटक केली असून गुरुवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने२दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा :
ज्यांना गौमातेची दुर्गंधी येत असेल, त्याने सनातनचा अपमान करता येईल, अशी भूमी शोधावी!
इजिप्तच्या लाल समुद्रात ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू!
सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला
‘हुर्रियतच्या दोन संघटनांचा फुटिरतावादाचा त्याग हा मोदींच्या नव्या भारतावरचा विश्वास’
पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार अटक करण्यात आलेला बांगलादेशी घुसखोर अजीजुल हा नागपूर हिंसाचाराच्या वेळी नागपूर मध्ये होता, हिंसाचारानंतर त्याने नागपूर सोडले आणि पुण्यात आला. पुण्यातून तो बुधवारी मुंबईत येताच त्याला अटक करण्यात आली आहे. अजिजुल याचा नागपूर हिंसाचारमध्ये सहभाग असल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेली माहिती अशी आहे की, नागपूरमधील हिंसाचारा
नंतर तेथे लपून बसलेले अनेक घुसखोर बांगलादेशी नागपूर मधून पळून गेले आहे.नागपूर हिंसाचारात आरोपीची काही भूमिका होती की नाही याचा तपास मुंबई गुन्हे शाखेने सुरू केला आहे. अटक करण्यात आरोपीं व्यतिरिक्त त्याचे अनेक बांगलादेशी साथीदार नागपुरात त्यांची ओळख लपवून राहत असल्याची माहिती समोर येत आहे.