महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) गुरूवार, १५ डिसेंबरपासून नव्याने उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावरून नागपूर-शिर्डी मार्गावर स्लीपर कोच एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. एमएसआरटीसीने प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की स्लीपर कोच एसटी बसेसही धावणार आहेत. या एसटी बसेस जालना मार्गे नागपूर आणि औरंगाबाद दरम्यान नवीन द्रुतगती मार्गावर धावणार आहेत.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, ११ डिसेंबर रोजी नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. ज्याला अधिकृतपणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या एसटी बसेस रात्री ९ वाजता दोन्ही स्थानकांवरून सुटतील आणि पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी इच्छित स्थळी पोहोचतील. नागपूर ते औरंगाबाद दरम्यानच्या या एसटी बसेस रात्री १० वाजता दोन्ही स्थानकांवरून सुटतील आणि पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी इच्छित स्थळी पोहोचतील. नागपूर-शिर्डी स्लीपर कोचचे एकेरी भाडे प्रौढांसाठी १ हजार ३०० रुपये आहे तर मुलांसाठी ६७० रुपये आहे, आणि नागपूर ते औरंगाबाद एसटी बसचे भाडे प्रौढांसाठी १ हजार १०० रुपये व लहान मुलांसाठी ५७५ रुपये आहे.
हे ही वाचा:
अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’
धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन
श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
तर नागपूर ते जालना एसटी बसचे भाडे प्रौढ प्रवाशांसाठी ९४५ रुपये आणि लहान मुलांसाठी ५०५ रुपये असेल. महाराष्ट्र राज्याच्या नवीन सवलतीमध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल तर ६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना ५० टक्के सवलत मिळेल. तसेच नवीन द्रुतगती मार्गावरून नागपूर-शिर्डी बससेवेमुळे १०२ किमी अंतर आणि प्रवासाच्या वेळेत ४ तास १५ मिनिटांची बचत होईल. तर नागपूर-औरंगाबाद एसटी बससेवेमुळे ५० किमी अंतर आणि ४ तास ४० मिनिटांची बचत होईल.