नागपुरात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गोंदियातील असून अनंत जैन असं आरोपीचं नाव आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. जैनच्या घरातून आतापर्यंत जवळपास १८ कोटी रुपयांची रोख रक्कम, १५ किलो सोनं आणि २० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. देशात फसणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
या प्रकरणातील क्रिकेट सट्टेबाज आरोपी अनंत जैन असून त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही परिचित होते.व्यापाऱ्याला फसवण्याची सुरुवात नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होती. तक्रारदार व्यापारी व्यवसायाच्या निमित्त आरोपीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे दोघांचा चांगला परिचय होता. आरोपीने ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याची बतावणी केली.आरोपीने आपल्या भाषेत व्यापाऱ्याला गुंडाळले.
आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यावर रम्मी, कॅसिनो आणि तीनपत्ती या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले. आधी व्यापाऱ्याने त्यास नकार दिला. मात्र, आरोपीने जास्तच आग्रह केल्याने व्यापारी तयार झाला. आरोपीने व्यापाऱ्याला ‘डायमंड एक्सचेंज डॉट कॉम’ या लिंक पाठवून त्याचं लॉगिन आणि पासवर्ड तयार करुन ऑनलाईन बेटिंग सुरु केले.
हे ही वाचा:
कुस्ती चाचण्यांमधून सवलत प्रकरणात उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप नाही, पंघल राखीव
मुंबईत तस्करी करून आणलेली ३० कोटींची घड्याळे जप्त
सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे नवीन पटनायक !
इर्शाळवाडीतील दरडग्रस्त अनाथ मुलांना डॉ. गोऱ्हे यांनी दिला दिलासा
व्यापाऱ्याला सुरुवातीला आपल्या बँक खात्यात आठ लाख रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यानंतर व्यापारी पैशाच्या आमिषापोटी अधिक जुगार खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला व्यापारी जिंकला. त्यानंतर तब्बल ५८ कोटी रुपये हरला. आरोपी अनंत हा सुद्धा ऑनलाईन गेम खेळत होता.व्यापारी स्वतः खेळात हारत जात होता तर दुसरीकडे आरोपी अनंत सतत जिंकत होता.त्यानंतर व्यापाऱ्याला त्याचा संशय आला.व्याप्याराने त्याच्याकडे त्याचे पैसे परत मागितले. मात्र अनंतने पैसे देण्यास नकार दिला.
याशिवाय व्यापाऱ्याला धमकावले गेले, जर हा विषय कोणाला सांगितल्यास अपहरण करुन मारण्याचीही धमकीही त्याला दिली. त्यातून व्यापाऱ्याने भीतीने उर्वरित चाळीस लाख रुपयेही अनंतला दिले. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तपास करत अनंत याच्यावर ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.यानंतर नागपूर गुन्हे शाखा आणि गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या गोदिंयातील घरी धाड टाकली असता, त्याच्याकडून जवळपास १८ कोटी रोख, १५ किलो सोने आणि २० किलो चांदी जप्त करण्यात आली. आरोपी अनंत जैन हा गोंदियातील क्रिकेट सट्टेबाज असल्याचं समोर आलं आहे. या ऑनलाईन फसवणुकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.सध्या आरोपी अनंत जैन हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.