शिवभोजन थाळीवरुन उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्याची मागणी सध्या नागपुरात केली जात आहे. शिवसेनेकडून शिवभोजन थाळीची सेवा राज्यभर पुरवली जाते.शिवभोजन थाळीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो सर्व ठिकाणी झळकत असल्याचे पाहायला मिळते.मात्र, शिवभोजन थाळीवरील उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवण्याची मागणी नागपुरातील पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस याना निवेदन देण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यातील गोर-गरिबांसाठी कमी शुल्कात पोषक आणि चांगले अन्न मिळावे या हेतूने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची योजना सुरू केली.त्यानंतर राज्यभर या योजनेचा लाभ अनेक गोर गरीब घेत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या काळात ही योजना सुरु केली असल्याने अजूनही उद्धव ठाकरे यांचेच फोटो झळकत आहेत.यावर नागपुरातील पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानकडून आक्षेप घेत उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवण्याची मागणी केली जात आहे.
हे ही वाचा:
दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच; सौम्य विश्वनाथन प्रकरणाने करून दिली आठवण
शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!
एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
बायडन आणि नेतान्याहू यांची भेट; हमासवर साधला निशाणा
पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानकडून ठाकरेंच्या फोटोवर आक्षेप का?
शिवभोजन थाळी ही गरिबांकरिता राबवण्यात येते. ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या योजनेवर विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे फोटो असणं आवश्यक आहे.उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रतिष्ठानकडून मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतरही बऱ्याच ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पालकमंत्र्यांचे फोटो लावले आहेत. ते हटवण्याची मागणी सध्या दीनदयाळ प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.तर या केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो लावण्यात यावे अशी मागणी या प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.