30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषनागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा

Google News Follow

Related

नागपूर मेट्रोच्या अभियंत्यांनी ३,१४० मीटर लांब डबल डेकर व्हायाडक्ट बांधून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.. वर्धा रोडवर बांधलेल्या  डबल डेकर व्हायाडक्टमध्ये छत्रपती नगर, जय प्रकाश नगर आणि उज्ज्वल नगर अशी तीन मेट्रो स्टेशन आहेत. या स्थानकांना विशेष नियोजनाची आवश्यकता होती, ज्यामध्ये डबल-डेकर व्हायाडक्टचा समावेश होता.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामात मेट्रो टीमसह अभियंते, कंपनी, सल्लागार, डिझाइनर यांनी काम जागतिक दर्जाचे बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २४ बाय ७ च्या धर्तीवर मेट्रोमध्ये काम करणार्‍या मजुरांपासून ते महत्त्वाच्या अधिकार्‍यांपर्यंत त्यांनी नागपूर मेट्रोला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने उल्लेखनीय काम केले आहे. नागपूर मेट्रोच्या कामांमुळे शहराची शान वाढली आहे. स्थानक इमारतींच्या सौंदर्यामुळे शहराचे आकर्षण वाढले आहे. कामादरम्यान अभियंता व कंपनीने दर्जेदार काम केले आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक आव्हानांना तोंड देत नागरिकांना कोणतीही अडचण न करता हे काम पार पाडण्यात संपूर्ण टीमची कामगिरी विसरता येणार नाही असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

डबल डेकर व्हायाडक्टमध्ये पहिल्या स्तरावर महामार्गावरील उड्डाणपूल आहे आणि दुसऱ्या स्तरावर मेट्रो रेल्वे आहे, ज्यामुळे ती जमिनीच्या पातळीवर विद्यमान महामार्गासह 3-स्तरीय वाहतूक व्यवस्था बनते. विशेष म्हणजे त्याच्या बांधकामासाठी जमीन संपादित करण्याची गरज नव्हती. त्यामुळे बांधकामाचा वेळ आणि प्रकल्प खर्च कमी झाला होता.

एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिझाइन आणि व्हायाडक्टचे काम केले आहे. कंपनीने मिहान आणि हिंगणा डेपोमध्ये ऑपरेशन रूम आणि रिच-१ येथे स्टेशन्सचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे काम केले आहे. वर्धा मार्गावर बांधण्यात आलेल्या डबल डेकरच्या बांधकामात एनसीसी लिमिटेडचे ​​काम उल्लेखनीय आहे. तसेच उज्ज्वलनगर ते मनीषनगर या एनएचआय उड्डाणपुलाचे सिव्हिल इंजिनीअरिंगचे काम पूर्ण करून एनसीसीने मनीषनगर, बेसा बेलतरोडी आदी ग्रामीण भागातील नागरिकांची रेल्वे फाटकावरील वाहतूककोंडीतून कायमची मुक्तता केली.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

आयटीडी सेमिस्टेशन इंडिया लिमिटेडने व्हायाडक्ट्स सोडून १० एलिव्हेटेड मेट्रो स्टेशनचे सिव्हिल इंजिनीअरिंग बांधकाम केले. यामध्ये शंकर नगर चौक, लोकमान्य नगर, बन्सी नगर, वासुदेव नगर रचना रिंग रोड, सुभाष नगर, धरमपेठ कॉलेज आदींचा समावेश आहे. ओरियन प्रो सोल्युशन लिमिटेड, हायबार टेक्नॉलॉजीज लिमिटेड, एक्सेलिस आर्किटेक्चरल सर्व्हिसेस प्रा. लि. सेवा पुरवल्या. शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि शिंडलर लिफ्ट कंपनीने प्रवाशांच्या सोयीनुसार प्रत्येक स्थानकावर लिफ्ट आणि एस्केलेटर डिझाइन आणि बांधले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा