१०० वर्षांनंतर नागालँडला मिळालं दुसरं रेल्वे स्थानक

१०० वर्षांनंतर नागालँडला मिळालं दुसरं रेल्वे स्थानक

भारताच्या ईशान्येकडील भागात असलेल्या नागालँडमध्ये राज्याला तब्बल शंभर वर्षांनंतर दुसरं रेल्वे स्थानक मिळालं आहे. शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी नागालँडमधील नवीन ‘शोखुवी’ रेल्वे स्थानक सुरू झाले आहे. काल या रेल्वे स्थानकावरून एका एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

नागालँडमधील पहिलं रेल्वे स्थानक हे १९०३ मध्ये बनलं होतं. नागालँडची राजधानी दीमापूर येथे पहिलं रेल्वे स्थानक सुरु झालं होतं. त्यानंतर आता शंभरहून अधिक वर्ष झाल्यानंतर या भागात दुसरं रेल्वे स्थानक बनलं आहे. ‘शोखुवी’ या रेल्वे स्थानकावरून ‘डोनी पोलो एक्सप्रेस’ रवाना झाली. तसेच कालचा दिवस नागालँडसाठी ऐतिहासिक आहे.

मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी नव्या ‘शोखुवी’ रेल्वे स्थानकावर ‘डोनी पोलो एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस याआधी आसाममधील गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशातील नाहरलागुन या दरम्यान चालवली जात होती. या एक्सप्रेसच्या थांब्यामध्ये वाढ करत टीमापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘शोखुवी’ रेल्वे स्थानकावरही आता ही एक्सप्रेस जाणार आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी ट्विट करून कालचा दिवस नागालँडच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

“भारतीय रेल्वे आणि ईशान्य फ्रंटियर रेल्वेसाठी (NFR) हा अभिमानाचा क्षण आहे. NFR ईशान्येकडील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेद्वारे जोडण्याचं काम करत आहे, अशी माहिती ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे महाव्यवस्थापक अंशुल गुप्ता यांनी सांगितले.

Exit mobile version